मोदी सरकारला केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा जीएसटीला ‘गब्बर सिंह टॅक्स’ असे संबोधित केले. देशात रोजगाराच्या संधी नसताना सरकार केवळ कर वाढविण्याचे काम करत आहे. केंद सरकार जगातील सर्वात वेगाने वाढणाऱया अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जीएसटीच्या दरांमधील वाढीमुळे महाग होणाऱया वस्तूंची एक यादी ट्विटरवर सादर करत जीएसटीला ‘गब्बर सिंह टॅक्स’ संबोधिले आहे. अधिक कर लादून जगातील सर्वात वेगाने वाढणाऱया अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे नष्ट करावे यावर भाजपचा मास्टरक्लास अशी उपरोधिक टिप्पणी राहुल यांनी केली आहे.