ऑनलाईन टीम/तरुण भारत
राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज राज्यातील पाचवा दिवस आहे. या यात्रेत अनेक राजकीय नेत्यांपासून नागरिक मोठ्या उत्सहाने सहभागी होत आहे. गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. यांनतर आज शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज राहुल गांधीं सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळाले. (Bharat Jodo Yatra Aditya Thackeray with Rahul Gandhi attended Bharat Jodo Yatra at Hingoli)
दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जातेय. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली असून काश्मीरपर्यंत जाणार आहे. ही पदयात्रा आहे. या यात्रेत राहुल गांधी सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील मिळताना दिसतंय. कारण राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेला शिवसेना पक्षही सहभागी झालाय.
हे ही वाचा : पोलीस हतबल, राज्य सरकारच्या सांगण्यावरून कारवाई : जितेंद्र आव्हाड
भारत जोडो यात्रेचा राज्यातील आज पाचवा दिवस असून ही यात्रा सध्या हिंगोलीतून जात आहे. विशेष म्हणजे आजच्या दिवशी शिवसेना नेते आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले. आदित्य ठाकरे यावेळी राहुल गांधींसोबत चालत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील आहेत.