Tarun Bharat

राहुल गांधींना रायगड भेटीचे निमंत्रण

भारत जोडो यात्रेत दिग्विजय मगदूम यांनी घेतली भेट

प्रतिनिधी,कोल्हापूर
भारत जोडो यात्रा संपल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी दुर्गराज रायगडला भेट देणार आहेत.कन्याकुमारहीहून सुरू झालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे.हिंगोली येथे काँग्रेस नेते माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील,आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे स्थानिक आमदार,पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते.

माजी महापौर (कै.)दिलीप मगदूम आणि माजी नगरसेविका दीपा मगदूम यांचे पुत्र दिग्विजय मगदूम इतर कार्यकर्त्यांप्रमाणे भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटले.यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या दुर्गराज रायगडची आणि त्याच्या इतिहासातील स्थानाची आणि तेथे साजऱया होणाऱया शिवराज्याभिषेक दिनाची माहिती दिली.तसेच रायगड भेटीचे निमंत्रणही दिले.राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पूर्ण झाल्यानंतर आपण महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून त्यावेळी आपण रायगडला निश्चितपणे भेट देऊ,असे दिग्विजय मगदूम यांच्याबरोबर झालेल्या संवादात सांगितले.

Related Stories

कार्तिक स्वामींच्या मुखदर्शनात भाविकांना समाधान

Archana Banage

शिवसेना आक्रमक : कन्नड रक्षण वेदिकेचा ध्वज जाळला

Abhijeet Khandekar

१३ वर्षीय अ.लाट चा जिनेंद्र ठरतोय देशात भारी, ओहवाले मिनी जीपी इंडिया सेरीजमध्ये  २ वेळा विजयी

Abhijeet Khandekar

सांगली-कोल्हापूर हायवेवर भीषण अपघात; दोन जागीच ठार

Abhijeet Khandekar

दुर्गमानवाड-मिसाळवाडी दरम्यानच्या साईटपट्ट्या खचल्या

Archana Banage

भारतीय कोरोना लस सुरक्षित – संजयबाबा घाटगे

Archana Banage