Tarun Bharat

पक्षाच्या पतनास राहुल गांधीच कारणीभूत

तेलंगणातील नेत्याची टीका ः काँग्रेसला ठोकला रामराम

वृत्तसंस्था/ हैदराबाद

काँग्रेस पक्षाला आणखी एक झटका बसला आहे. तेलंगणातील पक्षाचे दिग्गज नेते एम.ए. खान यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. राज्यसभेचे माजी खासदार एम.ए. खान यांनी काँग्रेस नेतृत्वाला लिहिलेल्या पत्रात अनेक आरोप केले आहेत.   आपण गतवैभव पुन्हा प्राप्त करत देशाच्या वाटचालीला दिशा देऊ शकतो असा विश्वास जनतेला देण्यास काँगेस पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला आहे. काँग्रेस पक्षाच्या पतनास राहुल गांधी हेच जबाबदार असल्याचे खान यांनी म्हटले आहे. 

पक्षाच्या भल्यासाठी जी23 गटाच्या वरिष्ट नेत्यांनी उठविलेल्या आवाजाला काँग्रेस नेतृत्वाने बंडखोरी समजले. जी23 गटाती नेत्यांवर विश्वास ठेवत पक्षासाठीची त्यांची तळमळ जाणून घेतली असती तर हे संकट  ओढवले नसते असे खान यांनी म्हटले आहे. खान हे जी23 गटाचे सक्रीय सदस्य होते आणि 2008-2020 पर्यंत ते राज्यसभा खासदार राहिले आहेत.

ज्येष्ठ नेत्यांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडले जात आहे. सद्यसिथती पाहता माझ्यासमोर पक्षातून राजीनामा देण्याशिवाय कुठलाच पर्याय नव्हता. काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांनी पद स्वीकारल्यापासून पक्षाला ओहोटी लागली आहे. राहुल गांधी यांनी स्वतःची वेगळी विचारसरणी असून ती बूथस्तरावरून ब्लॉक स्तरावरील कुठल्याही सदस्याला रुचणारी नाही. दशकांपर्यंत पक्षाला बळकट करणारे दिग्गज नेतेही काँग्रेस साडत आहेत. वरिष्ठ सदस्यांना कशाप्रकारे वागवावे हे राहुल गांधींना माहित नसल्याचा दावा खान यांनी केला.

यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. या पार्श्वभूमीवर खासदार मनीष तिवारी अन् आनंद शर्मा हे देखील लवकरच काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे मानले जात आहे. आझाद यांचे समर्थक अन् जम्मू-काश्मीरमधील नेते जी.एम. सरुरी, हाजी अब्दुल राशिद, मोहम्मद अमीन भट, गुलजार अहमद वानी अन् चौधरी मोहम्मद अकरम यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

Related Stories

विधिमंडळाचे अधिवेशन उद्यापासून

Patil_p

पुलवामा येथे कमी शक्तीचा स्फोट

Patil_p

31 मार्चपासून देश होणार निर्बंधमुक्त

datta jadhav

आता मेरठमध्ये होणार पुरातत्व विभागाचे नवीन कार्यालय

Tousif Mujawar

रशियन राजकीय नेत्याचा भारतात संशयास्पद मृत्यू

Patil_p

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar