बुलढाणा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी वि. दा. सावरकर यांना लक्ष केले नाही असे सांगून राहूल गांधींनी केवळ एक “ऐतिहासिक सत्य” अधोरेखित केले असल्याचे म्हटले आहे.
कॉंग्रेसचे भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी राहूल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचे सांगून राहूल गांधी यांनी फक्त ऐतिहासिक सत्य अधोरेखित केले असल्याचे म्हटले आहे. तसेच राहील गांदी यांच्या या विधानबद्दल माहविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वि. दा. सावरकर हे भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रतीक असल्याचे राहुल गांधा यांनी एका पत्रकर परिषदेत म्हटले होते. राहूल गांधींच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात भाजप आणि त्यांच्या सहकारी मित्रपक्षकडून निषेध करण्य़ात आला आहे.


previous post