Tarun Bharat

Rahul Gandhi : गुजरातच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो,राहुल गांधी

Gujrat Assembly Election Results 2022 : गुजरातच्या जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो.देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी आम्ही पुनर्गठन करू, कठोर परिश्रम करू आणि लढत राहू अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत दिली. 27 वर्षानंतर गुजरातमध्ये भाजपचा एेतिहासिक विजय झाला तर काँग्रेसला मात्र 17 जागांवर समाधान मानावे लागले. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने आपला गड राखला आहे. या पार्श्वभूमिवर राहुल गांधी यांनी जनतेचे ट्विट करत आभार मानले .

ट्विट करत काय म्हणाले राहुल गांधी

या निर्णायक विजयासाठी हिमाचल प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार.सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे हार्दिक अभिनंदन.या विजयासाठी तुमची मेहनत आणि समर्पण खरोखरच शुभेच्छांना पात्र आहे.
मी पुन्हा आश्वासन देतो की,जनतेला दिलेले प्रत्येक वचन लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.तसेच गुजरातच्या जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो.देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी आम्ही पुनर्गठन करू, कठोर परिश्रम करू आणि लढत राहू असेही ते म्हणाले.

Related Stories

मध्यप्रदेशात ‘गो कॅबिनेट’साठी झाली पहिली बैठक

datta jadhav

डॉक्टरांचे ऐका, दोन मास्क घाला

Patil_p

काश्मीर मुद्दा उपस्थित करणे पाकच्या अंगलट

Patil_p

मोदींच्या केदारनाथ भेटीला पुजाऱ्यांचा विरोध

Archana Banage

‘या’ कारणासाठी इस्त्रायलनं मराठीत ट्विट करत मानले मुख्यमंत्री ठाकरेंचे आभार

Archana Banage

“बापाकडून” “बेट्यावर” परोपकार, पाकला देणार 4.5 कोटी डोस

datta jadhav