कॉंग्रेस नेते खासदार राहूल गांधी (Rahul Gtandhi) यांनी भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी (Atalbohari Vajpeyee ) यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेवून त्यांना अभिवादन केले. त्यांच्या अभिवादनाचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यावर भाजपच्या नेत्यांनी हल्लाबोल चढवून ही ‘नौटंकी’ असल्याचा आरोप राहूल गांधीवर केला आहे.
रविवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी झाली. याचे औचित्य साधून राहूल गाधी यांनी वाजपेयींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. तत्पुर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाशी संलग्न असलेल्या गौरव पांधी या एका नेत्याने ‘वाजपेयी यांनी ब्रिटिशांची बाजू घेतल्याचा आरोप करणारे ट्विट केले होते’ आणि नंतर ते हटवण्यात आले. यावर भाजपच्या नेत्यांनी कॉग्रेसवर हल्लाबोल चढवून एकिकडे कॉंग्रसचे कार्यकर्ते माजी पंतप्रधानांचा अपमान करतात तर राहूल गांधी अभिवादनाची कृती ही केवळ नाटक करतात असा आरोप केला.
राहुल गांधी यांनी आज सोमवारी महात्मा गांधी याच्यासह वाजपेयीं आणि इतर अनेक माजी पंतप्रधानांच्या ‘समाधी’ला भेट दिली. आपली भुमिका स्पष्ट करताना काँग्रेसने म्हटले केले की, ‘गौरव पंधी यांनी वादग्रस्त ट्विट हटवले असून कॉंग्रेस पक्षाची भूमिका आणि राहुल गांधी यांची भूमिका एकच आहे’ असे ठासून सांगितले आहे.


previous post