पी. चिदंबरम यांचे विधान ः अध्यक्षपदासाठी दर्शविला पाठिंबा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शविला आहे. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष झाले तरीही किंवा नाही झाले तरीही त्यांचे पक्षात नेहमीच ‘विशेष स्थान’ राहणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी स्वीकारार्हता असल्याचे उद्गार चिदंबरम यांनी काढले आहेत.
राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे, परंतु त्यांचा हा विचार बदलेल अशी अपेक्षा आहे. पक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीची निष्पक्षता आणि पारदर्शकतेवर कुठलाही वाद होण्याची शक्यता नसल्याचे चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
उमेदवारी अर्ज भरणाऱया प्रत्येकाला मतदारयादीची एक प्रत मिळणार आहे. काँग्रेसमधील निवडणुकीशी संबंधित पदाधिकारी मधुसूदन मिस्त्राr यांनी अनेक मुद्दय़ांवर प्रक्रिया स्पष्ट केली असल्याचा दावा चिदंबरम यांनी केला आहे. लोकसभा खासदार शशी थरूर, मनीष तिवारी, प्रद्युत बारदोलोई, कार्ति चिदंबरम आणि अब्दुल खालिक यांनी मिस्त्राr यांना पत्र लिहून काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीतील मतदारांची यादी उपलब्ध करण्याची विनंती केली होती.
भाजप किंवा अन्य कुठल्याही पक्षाने अंतर्गत निवडणूक घेतली असता प्रसारमाध्यमांनी अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले नव्हते. जगतप्रकाश नड्डा यांनी मतदारयादी मागितली असो किंवा उमेदवारी अर्ज दाखल केला असे आठवत नसल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष म्हणून ज्याची निवड केली जाईल, तो उत्तम कामगिरी करेल आणि पक्षाचे कार्यकर्ते तसेच नेत्यांकडून सन्मान प्राप्त करू शकेल अशा विश्वास असल्याचे विधान चिदंबरम यांनी केले आहे.