Tarun Bharat

राहुल गांधी पंतप्रधान नाही; पण विको वज्रदंतीचे ब्रँड ॲम्बेसडर नक्की होतील

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो यात्रा’ आता कर्नाटकात पोहचली आहे. या यात्रेतील एका फोटोवरून भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. भातखळकर यांनी राहुल गांधी यांचा ऊस खात असतानाचा फोटो ट्विट करत “राहुल गांधी पंतप्रधान झाले नाहीत, होणारही नाहीत. पण विको वज्रदंतीचे ब्रँड ॲम्बेसडर नक्की होतील,” असा टोला लगावला आहे.

27 सप्टेंबरला राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील कन्याकुमारीमधून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे. 150 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवास आणि यात्रेदरम्यान 3,500 किमीचे अंतर कापले जाणार आहे. ही यात्रा आता केरळमधून कर्नाटकात पोहचली आहे. राहुल यांनी रविवारी नंजनगुड येथील प्रसिद्ध आणि प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिरात दर्शन घेतले. यानंतर, सायंकाळी त्यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर एका सभेला संबोधित केले. पाऊस सुरू असतानाही आपल्या यात्रेत खंड पडलेला नाही’, असे राहुल गांधी भाषणवेळी म्हणाले होते. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. भातखळकर यांनीही राहुल गांधींचा व्हायरल फोटो ट्विट करुन त्यांची खिल्ली उडवली आहे.

अधिक वाचा : राऊतांचा दसरा कोठडीतच; मुक्काम 10 ऑक्टोबरपर्यंत वाढला

Related Stories

शेतकर्‍यांच्या सर्वांगिण विकासासाठी ‘चिंचणेर पॅटर्न’ दिशादर्शक

Archana Banage

काँग्रेस राजीव सातव यांच्या पत्नीला विधानपरिषदेवर पाठवणार?

datta jadhav

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ परीक्षा पुढे ढकलल्या : उदय सामंत

Tousif Mujawar

चौकशीला सामोरे जाणार:हसन मुश्रीफ

Abhijeet Khandekar

ठाणे, कल्याण डोंबिवलीत 2 ते 12 जुलैपर्यंत पुन्हा लॉक डाऊन

Tousif Mujawar

कृष्णा हॉस्पिटलमधून आणखी 9 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

Patil_p
error: Content is protected !!