Tarun Bharat

राहुल गांधी उमेदवार नाहीत?

Advertisements

काँगेस नेते जयराम रमेश यांचे सूचक वक्तव्य, अशोक गेहलोत यांची सोनिया गांधींशी दोन तास चर्चा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला आता काँगेसमध्ये वेग आला आहे. आज गुरुवारी अध्यक्षपद निवडणुकीची अधिसूचना काढली जाणार आहे. 23 पासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. राहुल गांधी या निवडणुकीत उतरणार नाहीत, अशी दाट शक्यता आहे. तसे झाल्यास ही लढत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केरळमधील काँगेस खासदार शशी थरुर यांच्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आणखी कोणी ज्येष्ठ नेता मैदानात येणार का, यासंबंधीही चर्चा राजकीय वर्तुळात घडत असल्याचे वृत्त आहे.

राहुल गांधी सध्या भारत जोडो पदयात्रा करीत आहेत. ते या यात्रेतून सुटी घेऊन 23 सप्टेंबरला दिल्लीत येतील. तेथे ते सोनिया गांधी यांची भेट घेतील. या भेटीत काँगेसच्या नव्या अध्यक्षासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींवरुन राहुल गांधी ही निवडणूक लढणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, ऐनवेळी काही आश्चर्यही घडू शकते, असेही बोलले जाते.

गेहलोत-सोनिया गांधी भेट

बुधवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँगेसच्या अस्थायी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी साधारणतः 2 तास चर्चा केली. मंगळवारी रात्री उशिरा गेहलोत यांनी राजस्थान मंत्रिमंडळाची बैठक बोलाविली होती. या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले याची माहिती देण्यात आली नाही. तथापि, गेहलोत यांनी अध्यक्षपद निवडणुकीसाठी अर्ज सादर केल्यास निर्माण होणाऱया परिस्थितीचा विचार या बैठकीत करण्यात आला असावा असे अनुमान आहे.

योग्य वेळी सांगू

सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर गेहलोत यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. योग्य वेळ येताच काय घडले ते सांगेन, अशी भूमिका त्यांनी घेतली. या अध्यक्षपद निवडणुकीत आपण कोणत्याही उमेदवाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन देणार नाही, असे गांधींनी स्पष्ट केल्याचेही सांगण्यात येत आहे. गांधी कुंटुंब कोणत्याही उमेदवारच्या विजयासाठी आवाहन करणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट झाल्यानंतरच या संबंधातील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या भेटीवर साऱयांचे लक्ष आहे.

तर मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल

अशोक गेहलोत काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले तर त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार, असे वक्तव्य दिग्विजयसिंग यांनी केले आहे. दोन्ही पदे एकाचवेळी त्यांना भोगता येणार नाहीत. राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मोठी असल्याने इतर कोणत्याही पदाचा भार त्यांना सोडावा लागेल. त्याशिवाय ते पक्षाध्यक्षपदाची कामे पूर्ण क्षमतेने करु शकणार नाहीत, असे त्यांचे मत आहे.

राहुल गांधींना भेटणार

गेहलोत गुरुवारी केरळमधील कोच्ची येथे जाणार असून ते पदयात्रा करीत असलेल्या राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. चर्चेचा मुख्य मुद्दा अध्यक्षपदाची निवडणूक हाच असणार हे निश्चित आहे. गेहलोत राहुल गांधी यांचा पाठिंबा मागणार का, हा प्रश्न असून गांधी तो घोषित करणार का, यावरही चर्चा होत आहे. तसेच गेहलोत काँगेसचे अध्यक्ष झाल्यास राजस्थानचे मुख्यमंत्रिपद कोणाला दिले जाणार, यासंबंधीही चर्चा होण्याचा संभव आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

राहुल गांधींना राजी करणार

राहुल गांधीनीच अध्यक्षपद स्वीकारावे अशी गळ त्यांना अशोक गेहलोत घालतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. राहुल गांधी यांना समजावण्याचा शेवटचा प्रयत्न ते करणार आहेत. मात्र, राहुल गांधी त्यांच्या निवडणूक न लढण्याच्या निश्चयावर कायम राहिले, तर मात्र गेहलोत त्यांच्या योजनेनुसार पुढील पावले उचलतील, असे सांगण्यात येत आहे.

गेहलोतच मुख्यमंत्री राहतील

गेहलोत काँगेसचे अध्यक्ष झाले तरी ते राजस्थाच्या मुख्यमंत्रिपदावरही राहतील, असे खळबळजनक विधान राजस्थानचे मंत्री प्रतापसिंग खाचरियावास यांनी केले. मंगळवारी रात्री उशिरा राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर त्यांनी हे विधान केल्याने बैठकीत नेमके काय घडले यावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. गेहलोत एकाच वेळी दोन्ही पदे सांभाळतील का? तशी अनुमती त्यांनी दिली जाईल काय? आाणि तसे झाल्यास राजस्थानातील त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांची प्रतिक्रिया काय असेल, हे प्रश्नही निर्माण होणार आहेत.

काँगेसमध्ये बदल घडणार?

ड काँगेसला 24 वर्षांनंतर प्रथमच गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार?

ड काँगेसचे अनेक नेते आजही राहुल गांधींच्याच मागे असल्याचा दावा

ड गेहलोत पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपद दोन्ही सांभाळणार का हा प्रश्न

Related Stories

खाद्यतेलाची आनंदवार्ता

Patil_p

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

युपीत माफिया न बाहुबली, केवळ बजरंगबली

Patil_p

सक्रिय रुग्णसंख्या अडीच लाखांवर

Patil_p

मुंबईत शिवसेनेला अवघड पेपर कोणता?

Patil_p

आसाम रायफल्सने घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला

datta jadhav
error: Content is protected !!