प्रतिनिधी/ सातारा
शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध तीनपानी जुगारावर छापा टाकत जुगाराचा 1 लाख 51 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सहा जणांवर कारवाई करत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना त्यांचे गोपनिय माहिती मिळाली की, सातारा शहरातील बुधवारनाका येथील सर्व्हिसिंग सेंटरचे पाठीमागे अवैध तीनपानी मटका जुगाराचा खेळ सुरू होता.
या माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने माहिती घेऊन बुधवारनाका येथील सर्व्हिंसींग सेंटरचे पाठीमागे अचानकपणे छापा टाकला. यावेळी या ठिकाणी अवैध तीनपानी मटका जुगार सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या ठिकाणाहून रविंद्र शंकर आवळे (वय-35 वर्षे रा. 270, बुधवारपेठ, सातारा), शामराव यशवंत कुऱहाडे (वय-40 वर्षे रा.ऐक्यप्रेस कॉर्नर, नामदेववाडी झोपडपट्टी), मनोज संपत माने (वय-49 वर्षे रा.198,बुधवार पेठ), रामा यमनप्पा देऊर(रा.आकाशवाणी केंद्राचेसमोर, आकाशवाणी झोपडपट्टी), दिलीप प्रभाकर गायकवाड (रा.प्लॉट नं.65, मेहेर देखमुख कॉलनी,करंजे), कल्याण मारुती खवले (रा.सिटी कोर्ट बिल्डींगचे पाठीमागे, मोळाचा ओढा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अवैध जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट व मोटार सायकल असा एकुण 1 लाख51 हजार 200 रूपये किंमतीचा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर त्या सर्व 6 इसमांविरुदध शाहुपुरी पोलीस ठाणेस अवैध जुगार खेळत असले बाबत गुन्हा दाखल करणेत आला आहे.
या कारवाईत पोलीस हेड कॉन्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्टेबल सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी केली आहे.