Tarun Bharat

PFI संदर्भात मिरजमध्ये पोलिसांची कारवाई, संशयित व्यक्तीची सांगली पोलिसांकडून चौकशी सुरु

एकजण चौकशीसाठी ताब्यात, स्थानिक पोलिसांच्या मदतीने केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई

प्रतिनिधी/मिरज

पीएफआय अर्थात पॉफ्यूलर फ्रं ऑफ इंडिया या संघटनेशी संलग्नीत असल्याच्या संशयावरुन शहरातील महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने केंद्रीय तपास यंत्रणा अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला आहे. मंगळवारी मध्यरात्री अडीच-पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पथकाने संशयिताच्या घरावर धाड टाकून एकास चौकशीकामी ताब्यात घेतले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी संबंधीत व्यक्तीला महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु असल्याची अधिकृत माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पीआयएफ इस्लामीक संघटनेशी संग्लनीत असण्याच्या संशयावरुन मिरजेत केंद्रीय पथकांच्या धाडी पडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पॉफ्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या इस्लामीक संघटनेविरुध्द देशभरात कारवाई सुरू आहे. केंद्रीय तपास पथकांनी आत्तापर्यंत एकूण 11 राज्यांमध्ये धाडी टाकल्या असून, देशविरोधी कृत्य केल्याच्या संशयावरुन अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातही एनआयए तपास यंत्रणेकडून धाडसत्र सुरू आहे. पीआयएफआय संघटनेची पाळेमुळे आता सांगली जिह्यात मिरजेपर्यंत येऊन पोहचल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा : …अन् कोल्हापुरात पोलीसांनी घातली पाकिस्तानच्या ध्वजावरून गाडी

सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (एलसीबी) आणि इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) या केंद्रीय गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री तीन वाजता महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात छापा टाकला. पीआयएफआय संघटनेच्या संपर्कात किंवा संलग्नीत असल्याच्या संशयावरुन एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. दुपारी अडीच वाजेपर्यंत संशयीताची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, संबंधीताचे नांव सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. दुपारी चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधीत व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी त्याला महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, केंद्रीय पथकांच्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी अवैध धंदे किंवा आर्थिक गुह्यांच्या विषयात केंद्रीय पथकांकडून कारवाईसाठी मिरजेत छापे पडले होते. आता थेट पीएफआय इस्लामीक संघटनेचा हस्तक असल्याच्या संशयावरुन एकास ताब्यात घेतल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Stories

राज ठाकरेंपाठोपाठ आता आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन

Tousif Mujawar

राऊतांवरील कारवाईमुळे आम्ही आनंदी; बंडखोर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

datta jadhav

माझ्या हत्येचा कट रचला जातोय; गायिका वैशाली भैसनेची धक्कादायक पोस्ट

datta jadhav

मिरजेत इलेक्ट्रॉनिक दुकानाचे गोडाऊन फोडणारे तीन चोरटे गजाआड

Archana Banage

स्वाभिमानी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवणार : महेश खराडे

Archana Banage

तिसरी लाट थोपवण्यासाठी आशासेविकांनी काम सातत्याने सुरु ठेवा- मुख्यमंत्री

Archana Banage