प्रतिनिधी/पणजी
इको टेक्स गोवातर्फे महाराष्ट्रातील रायगड आणि प्रतापगड किल्ल्यांचा 147 वा टेक जाहीर केला आहे. या दोन्ही किल्ल्यांवरील टेकिंगबरोबरच, महाबळेश्वर आणि पाचगणी या सुंदर हिल स्टेशनला भेट देण्याचे आणखी आकर्षण आहे.
शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता पणजी बसस्थानकासमोरील हीरा पेट्रोल पंप येथून आणि म्हापसा रेसिडेन्सीसमोरील गांधी सर्कल समोरून रात्री 08.20 विशेष बस सुटेल.
किल्ले रायगडवर एकतर 1737 पायऱया चढून किंवा रोप वेने जाता येते. किल्ले प्रतापगडावर बसने गडाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पोहोचल्याने सहज जाता येते. मुस्लिम सरदार अफझलखान याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केल्यामुळे प्रतापगड इतिहासात प्रसिद्ध झाला होता.
2 दिवस आणि 3 रात्री अशाप्रकारे ही मोहीम आहे. या मोहिमेत सहभागी सोमवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता गोव्याला परततील.
अधिक माहितीसाठी इको ट्रेक्स गोवाचे संस्थापक दुर्गादास परब (म्हापसा) 9422445444/ 7588445444 यांच्याशी संपर्क साधा.