Tarun Bharat

कामतापूर राज्याच्या मागणीवरून रेल रोको आंदोलन

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्हय़ातील मैनागुडीमध्ये उत्तर बंगालकरता वेगळय़ा कामतापूर राज्याची मागणी करणाऱया एका संघटनेने रेलरोको आंदोलन मंगळवारी केले आहे. या आंदोलानामुळे रेल्वेवाहतूक 4 तासांहून अधिक काळ प्रभावित राहिल्याची माहिती एका अधिकाऱयाने दिली आहे.

आमची मागणी केंद्र तसेच राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी रेलरोको आंदोलन केल्याचे कामतापूर स्टेट डिमांड फोरमच्या पदाधिकाऱयांनी म्हटले आहे. मैनागुडीतील आंदोलनमुळे अनेक रेल्वेगाडय़ांना विविध स्थानकांवर रोखण्यात आले होते. तसेच काही रेल्वेगाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले होते. उत्तर बंगाल या वेगळय़ा राज्याच्या निर्मितीच मागणी दीर्घकाळापासून होत आहे. या मागणीला मागील काही काळापासून स्थानिक स्तरावर पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

Related Stories

मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी : केंद्र आणि पंजाब सरकारला तपास थांबविण्याचे आदेश

datta jadhav

मराठा आरक्षण सुनावणी महत्वाच्या टप्प्यावर

Archana Banage

देशात 12 तासात 240 नवे कोरोना रुग्ण

prashant_c

दोन आठवड्य़ात बाराव्यांदा इंधन दरवाढ

Patil_p

…पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते : राहुल गांधींचा हल्लाबोल

Tousif Mujawar

400 कोटींचे हेरॉईन गुजरातमध्ये जप्त

Patil_p