Tarun Bharat

रेल्वे सरव्यवस्थापकांनी घेतला आढावा

हुबळी-बेळगाव रेल्वेमार्गाची पाहणी

प्रतिनिधी/ बेळगाव

नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव किशोर यांनी शनिवारी सकाळी हुबळी-बेळगाव रेल्वेमार्गाचा आढावा घेतला. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण गतीने सुरू आहे. त्यातील एक भाग असणाऱया देसूर-खानापूर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असल्याने त्यांनी हा आढावा घेतला.

बेळगाव ते मिरज दरम्यानच्या बऱयाचशा भागाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण झाले असून उर्वरित मार्गाला गती मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देसूर-खानापूर या रेल्वेमार्गाची रेल्वे अधिकाऱयांनी नुकतीच पाहणी केली. शनिवारी सरव्यवस्थापक संजीव किशोर व त्यांच्या टीमने हुबळी-बेळगाव दरम्यान नवीन तयार करण्यात आलेल्या रेल्वेमार्गाची पाहणी केली. काही ठिकाणी अडथळे येत असून त्याठिकाणी तोडगा कसा काढला जाईल, याविषयी चर्चाही करण्यात आली. यावेळी हुबळी विभागीय व्यवस्थापक अरविंद मालखेडे, रेल्वे अधिकारी अतुल काकणे यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

रोहयोत लोंढा ग्राम पंचायत ठरली तालुक्मयात अव्वल

Amit Kulkarni

टिळकवाडी राणाप्रताप रोड येथील बंगल्यात धाडसी चोरी

Amit Kulkarni

स्टेशन रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

महिला आघाडीच्या बैठकीत चर्चा

Amit Kulkarni

मराठी अस्मितेसाठी होणार महामेळावा

Patil_p

पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलची सुपरस्पेशालिटी ओपीडी बेळगावमध्ये

Amit Kulkarni
error: Content is protected !!