Tarun Bharat

रेल्वेस्थानक ते सांबरा विमानतळ बससेवेला प्रारंभ

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव
कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वेस्थानक ते सांबरा विमानतळ बससेवेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते ‘रेल टू एअर’ या बससेवेचे सांबरा विमानतळावर उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता रेल्वे आणि विमानाचा प्रवास करणाऱया प्रवाशांना सोयीस्कर होणार आहे.

बस, रेल्वे आणि विमानाने प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीखातर परिवहनने रेल्वेस्थानक-सांबरा विमानतळ बससेवा सुरू केली आहे. रेल्वे व विमानाचे चित्र रेखाटलेली आकर्षक बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. त्यामुळे रेल्वे आणि विमान प्रवाशांना बसचा प्रवास करता येणार आहे.

रेल्वे आणि विमान प्रवाशांना बससेवेअभावी रिक्षा, टॅक्सी या खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. दरम्यान वाहने वेळेत मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. याकरिता मागील काही दिवसांपासून रेल्वेस्थानक ते विमानतळ बससेवा सुरू करा, अशी मागणी जोर धरून होती. अखेर या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीला यश आले आहे. सुरुवातीच्या काळात या मार्गावर केवळ एक बस धावणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास बसफेऱया वाढविल्या जाणार आहेत. शिवाय सांबरा विमानतळावरून मध्यवर्ती बसस्थानक मार्गे ही बस रेल्वेस्थानकापर्यंत धावणार आहे. त्यामुळे बसस्थानकातील प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.

प्रवाशांना बस लक्षात यावी, याकरिता बसचे नूतनीकरण करून चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये या बसचे आकर्षण निर्माण झाले आहे.

Related Stories

कोरोना : बेंगळूर विमानतळावर एसी तापमान नेहमीपेक्षा दोन अंशाने वाढविले

Abhijeet Shinde

कायदा मंत्री मधुस्वामी यांची बार असोसिएशनला भेट

Amit Kulkarni

पक्षकारांना तातडीने न्याय देण्यासाठी प्रयत्न करा!

Rohan_P

कारवार केंद्राऐवजी दहावी विद्यार्थ्यांची सोय गोव्यातच करावी

Patil_p

सोलापूर- वास्को रेल्वेचा प्रस्ताव

Patil_p

पतंजली योग समितीतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Amit Kulkarni
error: Content is protected !!