Tarun Bharat

रेल्वे वाहन वाहतुकीची क्षमता दुप्पट करणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रेल्वेने नुकताच मालवाहतुकीचा विक्रम केलेला आहे. आता कार आणि एसयुव्ही यांची वाहतुक करण्याची क्षमता दुप्पट करण्याची योजना रेल्वेने आखली असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे रेल्वेच्या खर्चात बचत होणार आहे. यासाठी रेल्वेने नव्या डिझाईनचे डबे तयार करण्याची योजना आखली आहे.

कार आणि एसयुव्ही यांची वाहतूक अधिक सुरक्षितपणे करण्यासाठी नव्या डब्यांमध्ये विशेष सोय उपलब्ध असेल. डिझाईनमध्ये बदल करण्याची माहिती कारनिर्मिती करणाऱया कंपन्यांनी अनेक वर्षांपूर्वीपासून केलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत कारवाहतुकीची क्षमता कमी असल्याने देशाच्या विविध भागात योग्यवेळी कार पोहोचविणे शक्य होत नाही. क्षमता दुप्पट झाल्यास ही त्रुटी दूर होऊन वाहन वाहतुकीचा वेग वाढेल असे स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

झोपडीवजा घरात राहतात अहमदाबादचे महापौर

Amit Kulkarni

देशातील जागतिक दर्जाच्या पहिल्या रेल्वेस्थानकाचे उद्घाटन

Patil_p

पायल रोहतगी आणि जीशान खानमध्ये जुंपली

Archana Banage

दिल्लीतील आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

Patil_p

देशात 4 महिन्यात तयार झाला 18 हजार टन जैववैद्यकीय कचरा

datta jadhav

खासगी संरक्षण कंपन्यांकरता मोठा पुढाकार

Patil_p