Tarun Bharat

उत्तरेत पाऊस तसेच बर्फवृष्टीचा अंदाज

पुणे / प्रतिनिधी :

हिमालयात एकापाठोपाठ एक पश्चिमी झंझावात धडकत असल्याने जम्मू-काश्मीरसह उत्तरेकडील अनेक राज्यात बर्फवृष्टी तसेच पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने गुरुवारी वर्तविला आहे. पुढील आठवडय़ात 23 ते 25 जानेवारीदरम्यान याची तीव्रता वाढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  

हिमालयात पश्चिमी झंझावाताच्या प्रभावामुळे जम्मू-काश्मीर, गिलगिट, बाल्टीस्थान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या भागात हिमवर्षाव हलकासा पाऊस होत आहे. याबरोबरच आणखी एका पश्चिमी झंझावाताच्या प्रभाव शुक्रवार रात्रीपासून ते 26 जानेवारीपर्यंत हिमालयात, तर वायव्य भागात 23 ते 25 जानेवारीदरम्यान जाणवणार आहे. यामुळे उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी तसेच पावसाची तीव्रता वाढणार आहे. याच्या प्रभावामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागात 23 ते 26 जानेवारीदरम्यान हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

महाराष्ट्रात किमान तापमान वाढणार

पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील किमान तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका कमी होणार आहे.  

Related Stories

भास्कर टोळीतील पाच जणांना मोका – पोलीस अधीक्षक

Abhijeet Khandekar

रूग्णाच्या डिस्चार्ज नियमावलीत बदल

Patil_p

नितीश सरकारचे अजब फर्मान; सरकार विरोधात आंदोलन केल्यास नोकरी नाही!

Tousif Mujawar

सुंदर पिचाई आणि पंतप्रधान मोदी यांची भेट; ‘भारताच्या G20 अध्यक्षपदाला पाठिंबा

Abhijeet Khandekar

बिहारमध्ये ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राचा विजय : पंतप्रधान मोदी

Archana Banage

तृणमूल काँगेसमध्ये उफाळला संघर्ष

Patil_p