Tarun Bharat

चीनमध्ये पाऊस-पूरामुळे मोठे संकट

जियांग्शी प्रांतात 5 लाख लोक बेहाल ः हजारो एकरातील पिकाची हानी

वृत्तसंस्था/ बीजिंग

Advertisements

चीनच्या जियांगी प्रांतात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे लोकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जियांग्शीमध्ये पाऊस आणि पुरामुळे 5 लाख लोक प्रभावित झाले असून 43,300 हेक्टरमधील पिकाची हानी झाली आहे.

पुरामुळे आतापर्यंत 7 कोटी डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. तर बुधवारी मान्सून यांग्त्जे नदीच्या खोऱयाच्या दिशेने सरकल्याने नदीची पातळी वाढण्याचा धोका आहे. जलविद्युत निर्मिती केंद्रांमधून पाण्याच्या पातळीवरून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आगामी 4 दिवसांमध्ये चीनमधील गोडय़ा पाण्याचे सर्वात मोठे सरोवर ‘पोयांग’ची पाणीपातळी वाढत राहणार आहे. पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वाढणार असल्याने संबंधित भागात पूर येण्याचा अनुमान हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दुसरीकडे जियांग्शीमधील काही ठिकाणी पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याचा तसेच जियोलॉजिकल आपत्तींचा धोका निर्माण होऊ शकतो. अधिकाऱयांनी हवामान बदल आणि पूर नियंत्रणासाठी उच्चस्तरीय देखरेखीची मागणी केली आहे.

पुरामुळे या प्रांताला जवळपास 40 कोटी डॉलर्सचा आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. या भागातून आतापर्यंत सुमारे 83 हजार लोकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. स्थानिक अधिकाऱयांनुसार 28 मेपासून पडत असलेला मुसळधार पाऊस आणि पूरामुळे प्रांतात मोठे संकट निर्माण झाले आहे.

Related Stories

भारताच्या मुत्सद्देगिरीला यश

Patil_p

इम्रान खान यांच्या पूर्व पत्नीवर जीवघेणा हल्ला

datta jadhav

भारताला घेरण्यासाठी चीन उभारतोय हवाई तळ

datta jadhav

मल्ल्याच्या फ्रान्समधील मालमत्ता ईडीकडून जप्त

datta jadhav

अमेरिकेत वाढू शकतात बळी

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी घेतला समोश्याचा स्वाद

Patil_p
error: Content is protected !!