Tarun Bharat

चाले खेळ उन – पावसाचा!

सकाळी पाऊस तर सायंकाळी सुर्यकिरणे :सकाळी 2.5 इंच विक्रमी पावसाची नोंद

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

राज्यात गुरुवारी सकाळी दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यात जास्त मुसळधार पावसाची नोंद झाली. पणजीत सकाळी दोन तासांमध्ये सुमारे 2.5 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली. परिणामी पणजीतील अनेक भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली. 18 जून रस्ता पाण्याखाली गेल्याने तासभर तेथील वाहतूक बंद करावी लागली. हवामान खात्याने पुढील 24 तासांत मुसळधार पावसाच्या इशाऱयाबरोबरच ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. दि. 27 जूनपर्यंत गोव्यात सर्वत्र मुसळधार पावासाची शक्यता व्यक्त केली आहे.

गुरुवारी सकाळी 10.30 ते 12.30 या दरम्यान सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पणजी वेधशाळेत 2.5 इंच तर मुरगावात 3 इंच पावसाची नोंद सकाळपासून सायं. 5.30 दरम्यान झालेली आहे. सकाळी 1 तासभर मुसळधार पावसाने झोडपून काढले आणि त्यामुळे तास दीड तास जनजीवन विस्कळीत झाले. त्यानंतर दुपारी 1 वा.पासून पावसाने विश्रांती घेतली. सायं. 5 वा. सूर्यकिरणे पडली आणि हवामानातील एक वेगळा बदल दिसून आला. सायंकाळी पावसाचा जोर बराच कमी झाला. मात्र हवामान खात्याने दि. 25 जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दि. 27 जूनपर्यंत गोव्यात सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या दरम्यान पिवळ्य़ा रंगाचा ऍलर्ट जारी केला आहे. गुरुवारी समाधानकारक पाऊस झाला. उत्तर गोव्यात 2.5 इंचाची नोंद झाली. दि. 27 जूनपर्यंत राज्यात समुद्र खवळलेला राहील. जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा जारी केला आहे.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत गोव्यात अद्याप 6 इंच पाऊस कमी झालेला आहे. गेल्या 24 तासात सरासरी 1.25 इंच पावसाची नोंद झालेली आहे तर गुरुवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान 2.5 इंच एवढी पावसाची नोंद झालेली आहे. 

गेल्या 24 तासातील पावसाची नोंद (इंचात)

म्हापसा           2.5

पेडणे             2

फोंडा             1

पणजी            1

जुने गोवे          1

काणकोण    3

दाबोळी           1.5

मडगाव           1

मुरगाव            1.25

केपे        2.50

सांगे        1.50

Related Stories

सांगे तालुक्यातील काजूच्या उत्पन्नात यंदा 50 टक्के घट

Amit Kulkarni

जीएसएलतर्फे गोव्याला ऑक्सजिन जनरेटिंग प्लांट

Amit Kulkarni

विधानसभेचा अखेर समारोप

Amit Kulkarni

वास्को रेल्वे स्थानकासमोर आता हायमास्ट ध्वजस्तंभ

Patil_p

शिरोडा येथून 31 हजाराची बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

Amit Kulkarni

चिरडणाऱया पोलिसास निलंबित करा

Omkar B
error: Content is protected !!