Tarun Bharat

इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीत पावसाचा व्यत्यय

Advertisements

लीड्स / वृत्तसंस्था

इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील तिसऱया कसोटी सामन्यात शनिवारी पावसाचा व्यत्यय आला. संततधारेमुळे खेळ थांबवावा लागला, त्यावेळी या लढतीच्या तिसऱया दिवशी न्यूझीलंडने 2 बाद 152 धावा जमवल्या होत्या. केन विल्यम्सन 110 चेंडूत 8 चौकारांसह 48 व डेव्हॉन कॉनव्हे 22 चेंडूत 11 धावांवर खेळत होते. लॅथमने सर्वाधिक 76 धावांचे योगदान दिले. या लढतीत न्यूझीलंडचा संघ यावेळी 121 धावांनी आघाडीवर होता.

न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद 329 धावा केल्यानंतर यजमान इंग्लंडने सर्वबाद 360 धावांसह डावाअखेर 31 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर न्यूझीलंडने 2 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली होती. 3 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडचा संघ तूर्तास 2-0 अशा एकतर्फी आघाडीवर आहे.

Related Stories

अफगाणचा क्रिकेटपटू नजीब ताराकाईचे अपघाती निधन

Patil_p

भारत-सर्बिया महिला फुटबॉल सामना आज

Patil_p

अंमली पदार्थ बाळगल्याचा लंकन क्रिकेटपटूवर आरोप

Patil_p

गोलंदाज प्रशिक्षकपदासाठी पारस म्हांब्रे इच्छुक

Patil_p

अँडरसनचे पाच बळी, भारत सर्व बाद 364

Patil_p

आशियाई स्पर्धेत बिलीयर्ड्सचे पुनरामन

Patil_p
error: Content is protected !!