तरुण भारत

गोव्यात सर्वत्र पावसाच्या सरी

प्रतिनिधी / पणजी

राज्यात गेल्या 24 तासांत जवळपास सर्वत्रच पावसाचा शिडकावा झाला, मात्र पेडणेमध्ये मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे. रात्रीच्या दरम्यान पडलेल्या पावसाची नोंद 2 इंचापर्यंत पोहोचली, तर इतर सर्व ठिकाणी अत्यंत तुरळक पावसाची नोंद झाली आहे.

Advertisements

आसानी चक्रिवादळाचा फटका गोव्याला बसला आणि गोव्यातील अनेक भागात बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली. पेडणेमध्ये सर्वाधिक 46 मि.मी. एवढी पावसाची विक्रमी नोंद झाली. गुरुवारी राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण होते. पणजीत सायंकाळी पावसाची रिपरिप सुरु झाली होती ती पहाटेपर्यंत चालूच होती.  पणजीत केवळ 4 मि.मी., म्हापसा 3 मि.मी, फोंडा येथे केवळ 1 मि.मी., जुने गोवे येथे 6.3 मि.मी., सांखळीत 9.4 मि.मी. तर वाळपई येथे 17.5 मि.मी. एवढी पावसाची नोंद झालेली आहे. काणकोण येथे 7.2 मि.मी., दाबोळी 5.4 मि.मी, मडगावात 10 मि.मी, मुरगावात 2.6 मि.मी तर सांगेमध्ये 17.9 मि.मी एवढा पाऊस झाला.

हवामान खात्याने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार आज दि. 13 मे रोजी गोव्यात वाऱयाचा वेग वाढलेला असेल व किंचित पावसाच्या सरी पडून जातील. वातावरण ढगाळ राहील.

Related Stories

तिस्क उसगाव पीडीए मार्केटचा स्लॅब कोसळून युकक जखमी

Patil_p

मोपातील गिरोबा उत्सवात भाविकांची गर्दी

Amit Kulkarni

दहावीच्या निकालाबद्दल आज अंतिम निर्णय

Amit Kulkarni

सांडपाणी निचऱयासाठी घातलेल्या जलवाहिनीचे निरीक्षण करण्यास मान्यता

Omkar B

2500 मतपत्रिका अवैध ठरवून नाकारण्याचा प्रकार

Amit Kulkarni

मडगाव पालिका कामगारांकडून झाडांचा कचरा जाळण्याचे प्रकार

Amit Kulkarni
error: Content is protected !!