Tarun Bharat

राज्यात कोसळल्या पावसाच्या सरी

मान्सूनबाबत हवामान खात्याकडून अधिकृत भाष्य नाही

प्रतिनिधी /पणजी

राज्यात मंगळवारी काही भागात तुरळक पावसाच्या सरी पडल्या. आज गोव्यात काही भागांत पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. मात्र मान्सून गोव्यात पोचण्यास आणखी किती दिवस लागतील, याबाबत पणजी वेधशाळेने कोणतीही शाश्वती दिलेली नाही.

मान्सून गायब झाल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले आणि त्यातून नव्याने चर्चा सुरू झाली. अनेकांनी कारवारमध्ये मान्सून पोचला का, याबाबबत प्रश्नचिन्ह उपास्थित केले. या संदभात पणजी वेधशाळेने खुलासा जारी केला, त्यात म्हटले आहे की मान्सून वाटेत अडकून राहण्याचा प्रकार नवीन नाही, अलीकडच्या काळात गेल्या वीस वर्षांत असे नऊ वेळा प्रकार घडले होते. इ. स. 2007 मध्ये मान्सून तब्बल 16 दिवस कारवारमध्येच अडकून राहिला होता. 20 मे ते 13 जून दरम्यान 16 दिवसांनंतर मान्सून कारवारहून गोव्यात पोचला होता.

इ.स. 2016 मध्ये कारवारमधून गोव्याला पोचण्याला मान्सूनला 9 दिवस लागले होते. यंदा 2022 मध्ये कारवारला मान्सून येऊन आज दि. 8 जून रोजी 9 दिवस होतील. मान्सून गोव्याकडे कधी सरकणार याबाबत मात्र हवामान खात्याने कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.

Related Stories

मडगाव पालिकेत दिपाली सावळ यांचा विक्रम

Amit Kulkarni

अटक केलीच तर 25 हजारांच्या बॉण्डवर सोडा

Patil_p

गुडे-शिवोली कदंब बस सुरु करण्याची मागणी

Amit Kulkarni

मंत्री मोन्सेरात, राणे यांची उद्या सोनसडय़ाला भेट

Amit Kulkarni

कामगार आयोगाच्या कार्यालया समोर कंदबा कर्मचाऱयांचे उपोषण

Amit Kulkarni

नोकरभरती घोटाळ्यावरुन गदारोळ

Amit Kulkarni