ऑनलाईन टीम/तरुण भारत
पावसाळा सुरू झाला की सर्वांची गडबड उडते ती छत्री, रेनकोट घेण्यासाठी पण त्याचबरोबर ज्यांना आरामदायक फील करायच असतो. ते नेहमी सीझनप्रमाणे कपड्यांची निवड करतात. जसे थंडीत जाड तर गरमीच्या सीझनमध्ये पातळ आणि सुती कपडे घालणे योग्य आहे. तसेच पावसाळ्यातही योग्य कपडे घातले की मान्सूनची मज्जाचं वेगळी येते. तर जाणून घेऊयात नेमके कशाप्रकारे कपडे परिधान करावेत.
कॉटनचे कपडे
पावसाळ्यात शक्यतो कॉटनचे कपडे वापरावे. कारण पावसाळ्यात कपडे भिजले की जाड कपडे पटकन वाळत नाहीत. कॉटनचे कपडे पटकन वाळवता येतात . ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी जाताना अंगावर कपडे ओले झाले तर तिथल्या तिथे पटकन सुकायला देखील मदत होते. जाड कपड्यांना वेळ लागतो.
सैलसर कपडे
पावसाळ्यात जर कपडे भिजले तर सैलसर कपडे अंगाला चिकटून राहत नाहीत .घट्ट कपडे परिधान केले तर ते अंगाला चिकटून घामोळ्या, बारीक पुरळ येऊ शकतात आणि घट्ट कपड्यांमुळे आतील कपड्यांचा आकार स्पष्ट दिसू लागतो त्यामुळे इतरांसमोर लाजिरवाणं वाटते.
फंगल इन्फेक्शन दूर करण्यास फॉलो करा ‘या’ टिप्स
पांढरे कपडे टाळा
सर्वात महत्वाचे की पावसाळ्यात पांढरे कपडे पूर्णपणे टाळले पाहिजेत. कारण आतील कपडे पांढऱ्या कापड्यातून स्पष्ट दिसतात. त्यामुळे अनकम्फर्टेबल तर वाटू लागतेच शिवाय चालताना अंगावर चिखल वगैरे उडला तर तो निघायला कठीण जातं. त्यामुळे शक्यतो डार्क कपडे वापरले पाहिजेत. उदाहरणार्थ निळा, काळा ,लाल असे कलरफुल कपडे वापरावेत.
शॉर्ट कपडे
ज्यना शक्य असेल त्यांनी पावसाळ्यात जास्तीत जास्त शॉर्ट कपडे परिधान करावे. जसे की शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट जीन्स, महिलांनी कुर्ता-पायजमा तसेच सध्या नवीन ट्रेंडमध्ये असलेली सिगार आणि पेन्सिल पँटही वापरू शकता.
जवळ स्कार्फ असू द्या
इतर दिवसांमध्ये आपल्याला लेगिंन कुर्त्यावर किंवा जीन्स टॉपवर स्टोल किंवा स्कार्फ घेण्याची गरज भासत नसते. पण पावसाळ्यात आपल्या जवळ स्कार्फ किंवा स्टोल असू द्या.
वापरा ह्या चपला
पावसाळ्यात लेदरच्या चपला वापरू नये. कारण, आपण चालताना चिखल जास्त उडतो त्यामुळे प्लास्टिकचे शूज,सँडल्स स्लीपर्स वापरावे
मेकअप असा असावा
पावसात मेकअप लगेच जाण्याची शक्यता असते. अशावेळी वॉटरप्रूफ प्रॉडक्ट वापरावे. त्यामुळे खूप वेळ तुमचा मेकअप राहू शकतो