Tarun Bharat

राज्यात पावसाचा जोर वाढणार

Advertisements

पुणे / प्रतिनिधी :

पुढील काही दिवस कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती मिळाली असून, ते आणखी पुढे सरकले आहेत.

अरबी समुद्रात दक्षिण गुजरात ते उत्तर कोकण किनारपट्टीला समांतर कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तसेच पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव ही वाढला आहे. यामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातही पाऊस राहील. देशात उत्तरप्रदेश तसेच मध्य प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे. याबरोबरच पूर्वोत्तर भारत व पूर्व किनारपट्टीवर पाऊस कायम राहील.

मान्सून पुढे सरकला

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी अरबी समुद्र तसेच गुजरातचा बहुतांश भाग व्यापला. पुढील चार ते पाच दिवसात मान्सून राजस्थान, उद्राराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये धडक मारेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Related Stories

साताऱ्यात एका दिवसात चौघे कोरोनाग्रस्त, जिल्हावासियांचा ठोकाच चुकला

Abhijeet Shinde

पोटनिवडणूक २०२१: देशात २ लोकसभा आणि १४ विधानसभा जागांसाठी मतमोजणी

Abhijeet Shinde

बार्शी : लघुपाटबंधारे विभागात भ्रष्टाचार फोफावला

Abhijeet Shinde

कसबा बीड परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Abhijeet Shinde

भाजपच्या रुपात इंग्रज परत भारतात आलेत: लालूप्रसाद यादव

Abhijeet Shinde

रिक्त पदांमुळे शिक्षण व्यवस्था सलाईनवर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!