शेतकरी, बागायतदारांबरोबच इतर लोकांची कामे अडली
प्रतिनिधी /पणजी
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवेळी पावसाची रिपरिप चालू असल्यामुळे शेतकरी बागायतदारांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. आंबा, काजू, कोकम यांचे पीकही पावसामुळे नष्ट झाले असून ऊनच नसल्यामुळे विविध पदार्थ सुकवणची कामे अडून राहिली आहेत. विवाह, साखरपुडा, मुंज अशा घरगुती कार्यक्रमांसाठी अनेकांना अडचण निर्माण झाल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले असल्याचे समोर आले आहे.
संपूर्ण राज्यात गेले दोन दिवस-रात्र बारिक पाउढस पडत असून त्याला जोर नसला तरी तो सातत्याने पडत असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबे, काजू काढणे मुश्कील बनले आहे. शिवाय पिकून तयार झालेली कोकम फ्ढळे पावसामुळे खाली पडून नष्ट होत आहेत. या पावसाचा फ्ढटका जनतेला बसला असून झाडावर पिकून तयार झालेले फ्ढणसही काढता येत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या या रिपरिपीचा अनिष्ट परिणाम फ्ढळझाडांवर झाला असून तयार झालेली फ्ढळे पावसाने हातची हिरावून नेली आहेत.
हवामान खात्याने पाऊस पडणार असल्याचा तसेच तो लवकर येणार असल्याचा इशारा दिला होता. तथापी तो एवढय़ा लवकर पडेल असे वाटले नव्हते. दोन दिवस-रात्र सातत्याने पडणाऱया पावसामुळे लोकांची अनेक कामे अडून राहिली आहेत. घरांची कौले बदलणे, शाकारणी करणे, पत्रे घालणे अशी कामे लोकांनी निश्चित केली होती. त्यास पावसामुळे बाधा निर्माण झाली असून दोन दिवस उढनच नसल्यामुळे कपडे सुकणे देखील मुश्कील झाले आहे. पणजीतील कांपाल मैदानावरील अन्न संस्कृती महोत्सवही स्थगित करण्याची पाळी सरकारवर आली आहे.
अन्न-सांस्कृतिक महोत्सव स्थगित
खराब हवामान आणि गेले 48 तास सतत बारिक पडत असलेल्या पावसामुळे दि. 20 ते 22 मे 2022 या कालावधीत पणजीतील कांपाल मैदानावर आयोजित केलेला अन्न आणि सांस्कृतिक महोत्सव स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाने दिली आहे. हा महोत्सव आता पुढे ढकलण्यात आला असून नवीन तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहे. महोत्सवाची संपूर्ण तयारी करण्यात आली होती, ती वाया गेली असून त्या मैदानात पावसामुळे चिखल झाला आहे.
राज्यात सरासरी 2 इंच पावसाची नोंद
गेल्या 24 तासात राज्यात सर्वत्र सरासरी 2 इंच पाऊस पडलेला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद ही वाळपई येथे झाली असून पेडणे, वाळपई, मडगाव आणि सांगे येथे जवळपास समान पाऊस झालेला आहे.
गेल्या 24 तासातील पाऊस पुढीलप्रमाणे
- ठिकाण सरासरी पाऊस इंचामध्ये
- म्हापसा 1
- पेडणे 2.5
- फोंडा 1.5
- पणजी 1
- जुने गोवे 1.5
- सांखळी 1.5
- वाळपई 2.5
- काणकोण 2
- दाबोळी 1.5
- मडगाव 2.5
- मुरगाव 1.5
- केपे 1.5
- सांगे 2.5