Tarun Bharat

पावसामुळे रावण सत्तरीत भातशेतीला फटका

वार्ताहर /केरी

गेल्या तीन दिवसांपासून संततधारपणे पडणाऱया अवेळी पावसामुळे सत्तरी तालुक्मयातील पेळावदा रावण येथील पारंपरिक शेती करण्याऱया गरीब शेतकऱयांची शेती पूर्णपणे भिजून नासाडी झाली आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

येथील यशवंत सहदेव सावंत, रत्नाकांत विष्णू सावंत या शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. यावषी वायंगणी भातशेतीचा हंगाम थोडा उशिराने झाल्याने भाताची कापणीला सतत पडणाऱया पावसामुळे विलंब झाला.  दोन दिवसांपूर्वी या शेतकऱयांनी आपल्या शेतातील भाताची कापणी केली असता त्याच रात्री पावसाला सुरुवात झाली. सलग तीन दिवस पाऊस पडत असल्याने कापणी केलेले भाताची उचलण्याची संधीचे शेतकऱयांना मिळाली नाही. त्यातच कापलेले भात शेतात राहिल्याने त्यात पूर्णपणे पाणी भरून भाताची पूर्ण नासाडी झाली आहे. त्यामुळे ही मोठी आर्थिक नुकसान झाली.

भात पिकल्याने पावसाच संभव नसल्याच अंदाज घेऊन आम्ही भात कापणी केली. पण भात कापणी केल्यापासून सुरू झाल्यापासून गेले तीन दिवस सतत पडत आहे. या पावसामुळे भात उचलून ठेवायला संधी मिळाली नाही. कापलेले भात उचलून ठेवले खरे पण तेही पूर्ण भिजले आहे. तर उर्वरित भात शेतामध्ये पडून राहिल्याने भात  पूर्णपणे नासाडी झाले आहे. यामुळे आम्हाला सुमारे 30 -35 हजार रुपयांचा नुकसान झाल्याचे पेळावदा रावण येथील यशवंत सावंत यांनी सांगितले.

नुकसान भरपाई देण्याची मागणी

दरम्यान या गरीब शेतकरी नुकसान झाल्याने ते हतबल झाले आहे. जमिनीची यंत्राद्धारे मशागत करणे, रासायनिक खते, मजुरी आणि सतत तीन महिने रात्रीची जंगली प्राण्यांपासून राखण करण्यासाठी ते बराच खर्च करतात. मात्र अखेरच्याक्षणी पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तेव्हा सरकारने त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱयांतून होत आहे.

Related Stories

मांद्रे भाजप मंडळातर्फे रक्तदान शिबिर

Patil_p

सरकारी कार्यालयात मोबाईल वापरणाऱयांना दणका

Amit Kulkarni

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापकाची नियुक्ती वादाच्या भोवऱयात

Patil_p

उमेश तळवणेकर यांचा पेडणे मगो मंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा

Amit Kulkarni

गांजा लागवडीचा प्रस्ताव पुढे नेणार नाही

Amit Kulkarni

घोगळ-मडगाव येथे बालकीर्तनकार साठेंची कीर्तने

tarunbharat