विशाल कदम/ सातारा
पाण्याच्या प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. तो अडवला पाहिजे. वाचवला पाहिजे. जमिनीत जिरवला पाहिजे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवली पाहिजे हे तत्व रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमाची आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतीच्या छत्तावर रेन वॉटर हारवेस्टींगचा प्रकल्प सुरु असून जिह्यातील शासकीय इमारतीमध्ये होणारा पहिलाच प्रकल्प आहे. यावर्षीच्या पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडून केंद्र शासनाच्या योजनेचे अंमलबाजवण्याची करण्यात येत आहे.
दुष्काळी भागात व जेथे पाण्याची टंचाई निर्माण होते तेथे पाण्याची किंमत कळते. पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये. पाण्याचा जमीनीतील स्थर उंचावा यासाठी रेन वॉटर हारवेस्टींग हा उपक्रम अलिकडे करण्याची सक्ती करण्यात येत आहे. इमारतीच्या बांधकामाला टाऊन प्लॅनिंगकडून परवाना दिला जात नाही. त्यामुळे खाजगी बांधकाम करणाऱया इमारतीच्या मालकांनी इमारतीच्या बांधकाम आराखडय़ात उल्लेख करुन परवानगी घेतली जाते. जुन्या शासकीय इमारतीमध्ये रेन वॉटर हारवेस्टींगची सोय नव्हती. परंतु नव्याने इमारतीच्या टेरेसवरील पाणी एकत्रीत करुन ते साठवले जाते किंवा मुरवले जाते. साठवलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येतो. मुरवलेल्या पाण्यामुळे बोअरिंगच्या पाण्याचा जलस्तर वाढतो. सातारा जिल्हा प्रशासनाशी गेल्या महिन्यात केंद्र शासनाच्या पाणी बचत विभागाच्यावतीने ऑन लाईन बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह जिह्यातील नगरपालिकांचे सर्व मुख्याधिकारी यांचाही सहभाग होता. त्यानुसार अगोदर आपल्या शासकीय इमारतीत हा उपक्रम राबवण्याचे आदेश केंद्र पातळीवरुन देण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौढा यांनी दोन्ही इमारतीत काम करण्याच्या सुचना बांधकाम विभागाला दिल्या.
बांधकाम विभागाने लगेच कार्यवाहीकरता आराखडा तयार करुन कार्यवाहीस सुरुवात केली. पाठीमागच्या इमारतीच्या छतावर काम सुरु करण्यात आले आहे. पाणी साठवणून ते खाली तळात आणण्यासाठी गेल्या आठ दिवसापांसून छतावर कामाची प्रक्रिया सुरु आहे. ते काम पूर्ण झाले की पुढच्या इमारतीच्या छतावर काम सुरु करण्यात येणार आहे. या कामासाठी 14 व्या वित्त आयोग वा जिल्हा परिषद सेस वा इतर फंडातून निधी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या इमारती 23 जुलै 2967 सालच्या आहेत. त्यामुळे रेन वॉटर हारवेस्टीगंचा प्रकल्प साकारणारी शासकीय इमारत म्हणून जिल्हा परिषद ठरणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांचा सकारात्मक दृष्टीकोन
जिल्हा परिषदेच्या एका इमारतीचे टेरेस 100 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद आहे. 1450 स्केअर मीटर एवढया क्षेत्रावर पावसाचे पाणी संकलीत करुन ते जिल्हा परिषदेच्या परिसरात मुरवण्याचा हा उपक्रम आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या सकारात्मक दृष्टीकोन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांचा आहे. त्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या 9 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला हा उपक्रम करण्यात आलेला आहे.