वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमध्ये बुधवारी दुसऱ्या दिवशीही रायपूरचे महापौर एजाज ढेबर आणि त्यांचा भाऊ अन्वर ढेबर यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. येथे सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एजाज ढेबर यांच्या समर्थकांनी कारवाईदरम्यान ईडी आणि केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. दुर्ग-भिलाईमध्ये विविध लोकांच्या 9 हून अधिक ठिकाणी कारवाई सुरू आहे. महापौर एजाज ढेबर यांच्या बंगल्यावर मंगळवारपासूनच ईडीची कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई सुरू झाल्यापासून महापौर बंगल्यासमोर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने ढोल वाजवून केंद्र सरकारचा निषेध करत आहेत.