पुण्याच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/सांगली
शहरातील मार्केट यार्डातील अडत व्यापारी बंधूची पुण्याच्या दोघांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. संशयित पराग नरेंद्र भांदेकर आणि रौनक देशपांडे या दोघांनी माळी बंधूकडून दोन वर्षांपूर्वी 11 लाख 40 हजार 920 रुपयांचा बेदाणा खरेदी केला आहे. परंतु अद्यापही संबधित रक्कम त्यांना दिली नाही. याप्रकरणी विजय शंकर माळी (रा. नदीवेस, मिरज) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.
सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डात माळी यांचे अवधूत ट्रेडींग कंपनी या नावाचे अडत दुकान आहे. या दुकानातून पुण्याच्या दोघा संशयीतांनी दि.4 एपिल 2019 ते 4 नोव्हेंबर 2021 या दरम्यान सुमारे 11 लाख 40 हजाराचा बेदाणा खरेदी केला आहे. खरेदी विक‘ाrच्या माध्यमातून ओळख झाल्याने विजय माळी आणि त्यांचे बंधू विनोद माळी यांनी संशयीतांना बेदाणा दिला. परंतु संशयीत पराग भांदेकर आणि रौनक देशपांडे या दोघांनी माळी यांना संबधित बेदाण्याची रक्कम अद्यापही दिली नाही. पैसे देण्यास टाळाटाळ करुन त्या दोघांनी आपली फसवणुक केल्याची फिर्याद माळी यांनी विश्रामबाग पोलिसांत दिली आहे.