Tarun Bharat

राजभवनचा निधी जनकल्याणासाठी वापरणार

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचा सत्तरीतील नवनिर्वाचित सरपंच, पंचांशी संवाद : गोवा संपर्क यात्रेद्वारे 220 गावांना भेट

प्रतिनिधी /वाळपई

लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रे÷ असते. जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारमार्फत सोडविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील समस्या या संदर्भात अनुभव घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण गेल्या सहा महिन्यांपासून करीत आहे. राजभवनचा निधी हा जनतेच्या सुखसोयींसाठी वापरला जाईल, अशी माहिती राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी स्पष्ट केले.

सत्तरी तालुक्मयातील नवनिर्वाचित सरपंच, पंचांशी वाळपई येथे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच पंच सभासद यांची मोठी उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर गोवा वनविकास महामंडळाच्या चेअरमन तथा पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे, नगराध्यक्ष सेहझीन शेख, उपनगराध्यक्ष अनिल काटकर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव देसाई, राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे व कार्यक्रमाचे संयोजक विनोद शिंदे यांची उपस्थिती होती.

 सहा महिन्यांत राज्यातील 60 टक्के भागात संपर्क यात्रा पूर्ण झालेली असून या दरम्यान 220 गावांना भेटी दिलेल्या आहेत. येत्या सहा महिन्यांमध्ये राज्यातील सर्व गावांना भेटी देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल.  पंचायत हा समाजिक विकासाचा महत्त्वाचा घटक असतो. याद्वारे भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे शक्मय आहे. यासाठी प्रत्येक सरपंच व पंच सभासदांनी सक्रिय असणे अत्यंत गरजेचे असल्याचे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले.

सत्तरी तालुक्मयाच्या सर्वांगीण विकासात प्रतापसिंह राणे यांचे मोठे योगदान  आहे. ते आदर्श राजकारणी असून आतापर्यंत आपले जीवन हे समाजासाठी समर्पित केले आहे. यामुळे त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. आरोग्य मंत्री विश्वजित राणे, पर्येच्या आमदार डॉ?. देविया राणे यांच्या कार्याचीही त्यांनी प्रशंसा केली.

डायलिसिस, कर्करोग रुग्णांना राजभवन निधीचा वापर!

गोव्याच्या राज्यपालाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राजभवनचा निधी हा पूर्णपणे जनतेसाठी वापरण्याचा निर्णय आपण घेतला. आतापर्यंत डायलिसिस रुग्ण व कर्करोग रुग्ण यांच्यासाठी मोठय़ा प्रमाणात आपण खर्च केलेला आहे. 220 जणांना याचा आतापर्यंत फायदा झालेला आहे. तर समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी सक्रिय असलेल्या समाजसेवी संस्थांसाठी राजभवनचा निधी देण्यात आलेला आहे?. याचा आतापर्यंत 71 समाजसेवी संस्थांना लाभ झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सत्तरीतील डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदत प्रदान

यावेळी सत्तरी तालुक्मयातील डायलिसिस रुग्णांना राज्यपालांच्या हस्ते राजभवन निधीतून आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. यामध्ये जुबेदा शेख, संतोष गावस, चंद्रकांत पार्सेकर व गोपाळकृष्ण पर्येकर यांचा समावेश आहे.

आमदार डॉ. दविया राणे यांनी राज्यपालांचे स्वागत केले. सत्तरी तालुक्यातील विविध विकास कामांची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच प्रस्तावित असलेल्या विकास प्रकल्पांचीही माहिती दिली. सुरुवातीला रती गावकर, सोमनाथ काळे, सरिता गावकर, नितेश गावडे, नामदेव राणे, अमित शिरोडकर, शराफत खान यांनी मान्यवरांनाग पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संवाद कार्यक्रमात मोर्ले सरपंच अमित शिरोडकर व भरोंडा पंचायतीचे सरपंच उदयसिंह राणे यांनी भाग घेतला. उदयसिंग नाणे यांनी यावेळी बोलताना भिरोंडा पंचायत क्षेत्रामध्ये इतिहासाची साक्ष देणारा नाणूसचा किल्ला व स्वातंत्र्यसैनिक दीपाजी राणे, दादा राणे यांचे कार्य या पंचायत क्षेत्राला प्रेरणा देत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मोर्ले सरपंच अमित शिरोडकर यांनी पंचायत क्षेत्रातील देवस्थाने व नदीबाबत माहिती दिली. यामुळे पाण्याच्या दृष्टीने मोठा फायदा होत असल्याचे सांगितले.

यावेळी होंडा सरपंच शिवदास माडकर, पिसुर्ले सरपंच देवानंद परब, ठाणे सरपंच सरिता गावकर, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, पर्ये सरपंच रती गावकर आदींनी राज्यपालांना पंचायत विकासावर आधारित पुस्तिका सुपूर्द केली. सुरुवातीला नगरगाव सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी स्वागत गीत व राष्ट्रगीत सादर केले. उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी आभार मानले.

Related Stories

फोंडा नगराध्यक्षपदावरुन भाजपामध्ये बंडाचे संकेत

Amit Kulkarni

जमीन घोटाळय़ासंदर्भात पोलिसांत 70 प्रकरणे

Omkar B

असे कार्य करा की यश तुमच्यामागे धावत यायला पाहिजे-पद्मश्री डॉ.मलाथी होल्ला

Patil_p

…तर कचरा मुख्याधिकारी, अभियंत्यांच्या दारात आणून टाकू

Omkar B

जानेवारीत 300 अपघातात 24 जणांना मृत्यू

Amit Kulkarni

म्हापसा चोरी प्रकरणी तीन चोरटय़ांना अटक

Omkar B