ऑनलाईन टीम/तरुण भारत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj-thackeray) यांनी मंगळवारी झालेल्या ठाण्याच्या उत्तर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit-pawar) यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांची नक्कल करत टीका केली. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद बोकाळला, या वक्तव्याचा राज यांनी पुनरुच्चार केला. यावेळी त्यांना पवार कुटुंबावर गंभीर आरोप केले. दरम्यान त्यांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत अजित पवारांची खिल्ली उडवली तसेच आरोपही केले. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही, योग्य वेळी उत्तर देऊ, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचं प्रत्युत्तर –
अजित पवार यांनी आज बुधवारी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांची ब्रीच कँडी रुग्णालयात (breach candy hospital) भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरेंवर भाष्य केलं. “मी आज धनंजय मुंडेंना भेटायला आलो आहे. त्यांना फार महत्त्व देऊ नका. माझ्या दृष्टीने धनंजय मुंडेंची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. माझा सहकारी रुग्णालयात आहे, त्याला मी भेटायला आलो आहे. दुसऱ्या प्रश्नांची उत्तरं मी योग्यवेळी देईन, त्या बद्दल काळजी करु नका. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे,” असं अजित पवार म्हणाले.