Raj Thackeray on Sindhudurg tour from November 30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. १ डिसेंबर रोजी दुपारी ते मालवणात दाखल होत असून या दिवशी ते मालवण मुक्कामी वास्तव्यास असणार आहेत. या दरम्यान कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी मध्ये ते संघटनात्मक बैठका ते घेणार असून सायंकाळी चिवला बीच येथे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार यांच्याशी संवाद साधणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या मंदिराला ते भेट देणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मालवण मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मालवण तालुक्यातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक हॉटेल विशाल मध्ये श्री. उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, रामनाथ पराडकर, भारती वाघ, प्राजक्ता पार्टे, संदीप लाड, प्रशांत पराडकर, विल्सन गिरकर, विशाल ओटवणेकर, उदय गावडे, साक्षी पार्टे, वैभव आजगांवकर, मिलिंद तेली, दर्शन सावजी, प्रतिक कुबल आदिंसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मालवण / प्रतिनिधी