Tarun Bharat

पुण्यात शनिवारी ‘राज’ गर्जना

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी अयोध्या दौरा, नियोजित सभेच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतर आता पुण्यातही 21 मे रोजी ‘राज’ गर्जना होणार आहे. सभेसाठी मनसेने डेक्कन येथील नदीपात्राची जागा निश्चित केली आहे. काही अटी आणि शर्थींसह पोलिसांकडून सभेला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

Advertisements

राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्याचं काहीही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त परवानगी देतील. पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांनुसार राज ठाकरेंनी सभा घेण्यासाठी काहीही हरकत नाही. वळसे पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान, अद्याप पोलिसांनी या सभेला परवानगी दिलेली नाही. पोलिसांकडून सभेच्या नियोजित ठिकाणाची पाहणी सुरू आहे.

दरम्यान, राज ठाकरे पुणे दौऱ्यामध्ये पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय मनसेच्या रविवारी पार पडलेल्या मेळाव्याबाबतही राज ठाकरे आढावा घेणार आहेत. पुढील महिन्यातील पाच तारखेला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, त्यादृष्टीनेही पुणे भेटीकडे पाहिले जात आहे.

Related Stories

वाईनविक्री विरोधातील अण्णा हजारेंचं उपोषण मागे

datta jadhav

आमचा देश कृषिप्रधान आहे ?

Abhijeet Khandekar

#MannKiBaat April 2021 : कोरोनाची दुसरी लाट मोठी, पण घाबरु नका -पीएम मोदी

Abhijeet Shinde

सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे कोविडविरोधी लढ्याला मोठी ताकद : अजित पवार

Rohan_P

पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून; बचावकार्याला वेग

datta jadhav

आव्हाडांनी अण्णांना दिल्या वाढदिवसाच्या उपरोधिक शुभेच्छा; म्हणाले…

datta jadhav
error: Content is protected !!