Tarun Bharat

भोंग्यांसंदर्भातील बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विट करत राज ठाकरेंनी सेनेला डिवचले

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी ठाकरे सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपला. त्यामुळे राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक झाले असून, मुंबईतील विविध भागात मनसैनिकांनी मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड सुरू झाली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्विट करून उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) डिवचले आहे. 

राज ठाकरे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे मशिदींवरील भोंग्यांबाबत आपली सडेतोड भूमिका मांडताना दिसत आहेत. बाळासाहेब म्हणाले होते, ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रात येईल. त्यावेळी रस्त्यावर पढले जाणारे नमाज आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. धर्म असा असावा लागतो तो राष्ट्रहिताच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा जर कुठे कुणाला उपद्रव होणार असेल. त्यांनी मला येऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करण्यासाठी तयार आहोत. 

राज ठाकरे यांनी हाच मुद्दा घेऊन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे भोंगा प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

Related Stories

सवयभानतर्फे रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बॅंक

Patil_p

सातारा : रूग्णांचा आकडा हजारासमीप

Archana Banage

ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगावर आज मतदान

datta jadhav

शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याचा सोमय्यांचा आरोप

Archana Banage

विना मास्क फिरणाऱया मनपाच्या अधीक्षकाला ५०० रूपयांचा दंड

Archana Banage

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar