Tarun Bharat

पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या ट्विटद्वारे सांगेन

ऑनलाईन टीम / मुंबई :

मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर राज्यातील प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर महाआरतीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका नेमकी काय असणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना राज ठाकरेंनी (raj thackeray) एक ट्विट केले आहे. पुढे नेमकं काय करायचं आहे, हे मी उद्या ट्विटद्वारे सांगेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्वटिद्वारे आपल्यासमोर मांडेन.”

दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी सरकारला उद्यापर्यंत (दि. 3) अल्टीमेटम दिला आहे. तर ईदनंतर मशिदींबाहेर भोंगे वाजले तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याच्या सूचनाही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना रविवारी दिल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे उद्या काय भूमिका घेणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

datta jadhav

चिंताजनक : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 10 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

अडीच हजार रुपये मिळणार केव्हा?

Patil_p

सर्वजन हिताय असा हा अर्थसंकल्प…साखर उद्योगाला सगळ्यात मोठा फायदा मोदी सरकारने दिला- देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar

बोकडांना समारंभपूर्वक बळी दिले जाते, सिंहांना नाही!

datta jadhav

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढीचे सत्र सुरुच; 14,718 नवे रुग्ण; 355 मृत्यू

Tousif Mujawar
error: Content is protected !!