युएईतून तीनवेळा आला फोन
वृत्तसंस्था/ हैदराबाद
वादग्रस्त टिप्पणी करणारे भाजप आमदार टे. राजा सिंह यांच्या वकिलाला संयुक्त अरब अमिरातमधून (युएई) धमकी मिळाली आहे. आमदाराच्या वकिलाला धमकीचे 3 फोन कॉल आले आहेत. राजा सिंह यांच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर हैदराबादमध्ये ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. मंगळवारी सकाळी राजा सिंह यांना अटक करण्यात आली होती. परंतु रात्री त्यांना जामीन मिळाला होता. याच्या विरोधात मंगळवारी रात्री झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये पोलिसांसह 4 जण जखमी झाले होते. मोठय़ा संख्येत एका विशेष समुदायाच्या सदस्यांनी गोशामहलच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखले आहे. भाजपने टी. राजा सिंह यांना पक्षातून निलंबित केले आहे.