Tarun Bharat

सालईवाड्यातील राजगुरू पाणंद पालिकेने दुरुस्त करावी – राष्ट्रवादीची मागणी

Rajaguru in Salaiwada should be repaired by the Panand Municipality – NCP’s demand

तीस वर्षाहून अधिक काळ लोटला तरी सालईवाड्यातील राजगुरू पाणंद (सामंत गॅरेज) पालिकेने दुरुस्त केली नाही. ही पाणंद रहिवाशांसाठी धोकादायक बनली आहे त्यामुळे ही पाणंद लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला अध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिकेकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्य लिपिक आसावरी शिरोडकर यांना निवेदन दिले .सालाईवाड्यातील राजगुरू पाणंद दुरुस्त होऊन तीस वर्षे लोटली आहेत .परंतु त्याची देखभाल व दुरुस्ती त्यानंतर झाली नाही.घुशी, उंदीर यानी पाणंद पोखरलेली आहे त्यामुळे रहिवाशांसाठी  ती धोकादायक बनली आहे. रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे .त्यामुळे पाणंदीची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर ,राकेश नेवगी, फिरोज खान, रेहना खान ,महमंद खान ,मनोहर सामंत ,प्रिसिला फर्नांडिस, विनोद नाटेकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

250 कोटी ही कोकणच्या जनतेची थट्टा!

NIKHIL_N

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील कोळथरे गोवलेवाडीचा रस्ता बंद

Archana Banage

तरुणांना तंबाखूमुक्तीची लाईव्ह शपथ

NIKHIL_N

गणपतीपुळे समुद्रात बुडताना कोल्हापूर येथील महिलेला वाचवले

Patil_p

कोकिसरे रेल्वे फाटक येथील भुयारी मार्गासाठी 64 कोटीचा निधी

NIKHIL_N

संकटकाळात नीलेश राणेंचा बंगल्यात बसून आराम!

NIKHIL_N