Tarun Bharat

राजस्थान मुख्यमंत्र्यांचा निर्णय एक-दोन दिवसात

के. सी. वेणुगोपाल यांची माहिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, हे येत्या एक-दोन दिवसांत ठरणार आहे. दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी पत्रकारांना यासंबंधी माहिती दिली. पक्षनिरीक्षक पुन्हा एकदा जयपूरला जाणार असून विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाणार आहे. त्यानंतर गेहलोत मुख्यमंत्री होणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तथापि, सद्यस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गेहलोत यांनी माघार घेतल्यामुळे तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची सुमारे दीड तास भेट घेतली. बैठकीनंतर गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.

Related Stories

बंगालमध्ये दीदींची हॅटट्रिक, आसाममध्ये पुन्हा भाजप ?

Amit Kulkarni

“कन्हैया कुमार रंग बदलणारा सरडा, भाजपातही प्रवेश करू शकतो”

Archana Banage

सिंगापूरच्या उपग्रहाचे इस्रोकडून प्रक्षेपण

Patil_p

पवन खेडांनी मागितली माफी ः शर्मा

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये 566 नवे कोरोना रुग्ण; 5 मृत्यू

Tousif Mujawar

मल्लिकार्जुन खर्गेंची ईडीकडून चौकशी

Amit Kulkarni
error: Content is protected !!