Tarun Bharat

राजस्थानमध्ये RSS संयोजकाची हत्या

ऑनलाईन टीम/तरुण

राजस्थानमधील (rajasthan) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सातत्याने ढासळत चालली आहे. पोलिसांना आव्हान देत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. उदयपूर (udaypur) विभागातील चित्तोडगड जिल्ह्यात मंगळवारी रात्री अज्ञातांनी खळबळजनक हत्याकांड घडवून आणले. माजी नगराध्यक्ष जगदीश सोनी यांचा मुलगा रतन सोनी यांच्यावर धारदार शस्त्रांसह आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केला. यामध्ये रतन सोनी (ratan soni) यांचा मृत्यू झाला आहे. या हत्तेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमंत्रक रतन सोनी यांची राजस्थानमधील चित्तोडगडमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे. यानंतर प्रशासनाने संपूर्ण शहरात कलम १४४ कलम लागू केले आहे. RSS संयोजक रतन सोनी रात्री उशिरा एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान पूर्ववैमनस्यातून इतर समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रतन सोनी यांचा मृत्यू झाला.

या हत्येमुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांच्या लोकांनी शहरातील मुख्य चौक अडवला. येथे रात्रभर निदर्शने सुरू होती. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांनी सांगितले की, संपूर्ण शहरात अलर्ट जारी करण्यात आला असून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुणांनी रतन सोनी यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे ते जखमी झाले. यानंतर उदयपूरच्या रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदू पक्षाच्या लोकांनी शहरातील सुभाष चौकात पूर्णत: रास्ता रोको करून आरोपींच्या अटकेची मागणी केली.

आरोपीचे नातेवाईक अटकेत
पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

Related Stories

शरद पवारांनी बोलवली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

Archana Banage

केरळमध्ये रिक्षाचालकाला लागली 25 कोटींची लॉटरी

Patil_p

किरकोळ महागाई दरात मार्च महिन्यात घट

Patil_p

दिल्ली : 15 दिवसात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची संख्या दुप्पट

datta jadhav

“रूंजी”चा अपघाती मृत्यू; मनाला “चटका” लावून गेला !

Abhijeet Khandekar

संरक्षण समितीच्या बैठकांना राहुल गांधींची कायम दांडी

Patil_p
error: Content is protected !!