Tarun Bharat

राजेंद्र माने सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त

प्रतिनिधी / सोलापूर

शहर पोलीस आयुक्तपदी राजेंद्र माने यांच्या नियुक्तीचे आदेश राज्याचे गृहविभागाकडून बुधवारी सायंकाळी काढण्यात आले आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्त हरीष बैजल यांच्या सेवानिवृत्तीनंतर आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार आयपीएस सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

राजेंद्र माने हे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. आज बुधवारी सायंकाळी गृहविभागाने राज्यातील पोलीस उपमहानिरीक्षक पदाच्या अधिकाऱयांच्या बदल्या जाहीर केल्या. यात सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून राजेंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र माने यांनी यापूर्वी सोलापूर पोलीस आयुक्तालयात उपायुक्त पदावर कर्तव्य बजावले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय हे पोलीस आयुक्त असताना राजेंद्र माने यांनी परिमंडळ विभागाचे उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावले आहे. आयपीएस सुधीर हिरेमठ यांचा कार्यकाळ अवघा काही दिवसांचा ठरला. त्यांनी काही दिवसांतच त्यांच्या कामाची चुणूक दाखविली. वाहतूक शिस्तीवर त्यांनी भर दिला होता. त्याअनुषंगाने वाहतुकीस अडथळा ठरणाऱया घटकांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली होती.

Related Stories

सोलापूर ग्रामीण भागात आज 135 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Archana Banage

बार्शीत दोन कोविड हॉस्पिटल निर्मितीचे काम सुरू – आमदार राजेंद्र राऊत

Archana Banage

मोठी ब्रेकींग : करमाळ्यात रेल्वे अपघात; मालगाडी रुळावरून घसरली

Abhijeet Khandekar

पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघातही सत्तापरिवर्तन

prashant_c

पंढरपूर तालुक्यातील सात गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

Archana Banage

पूजा बलदोटा झाल्या कुर्डुवाडी शहरातील पहिल्या महिला चार्टर्ड अकाऊंटंट

Archana Banage