डॉ. सौरभ कित्तूर, अनघा नाईक उपविजेती
बेळगाव : देसूर येथील गोल्फ मैदानावर शंतनू पुसाळकर आयोजित प्रभाकर पुसाळकर स्मृतिचषक गोल्फ स्पर्धेत पुरुष गटात राजेश कांबळे तर महिला गटात सौम्या कांबळे यांनी विजेतेपद तर डॉ. सुबोध कित्तूर व अनघा नाईक यांनी उपविजेतेपद पटकाविले. देसूर येथील गोल्फ मैदानावर आयोजित प्रभाकर पुसाळकर स्मृतिचषक गोल्फ स्पर्धेचे उद्घाटन शंतनू पुसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत 75 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
मॅक्सिमम बर्डिज यल्लाप्पा, लाँगेस्ट ड्राईव्ह सुरेश अवती, निरेस्ट टू पिन प्रितम नसलापुरे, महिला गटातील विजेती सौम्या कांबळे तर उपविजेत्या अनघा नाईक, वयस्करांच्या गटातील विजेतेपद सतीश पाटील यांनी पटकाविले तर उपविजेतेपद निवृत्त मेजर जनरल ए. बी. सय्यद यांनी पटकाविले. 0 ते 9 एचसीपीचे विजेतेपद अल्हाद पाटील, तर उपविजेतेपद योगेंद्र वाटवे, 10 ते 18 एचसीपीचे विजेतेपद श्रीशैल खोत तर उपविजेतेपद राहुल मिरजकर, 19+ एचसीपीचे विजेतेपद अप्राज तर उपविजेतेपद अलोक वैद्य व महांतेश कागतीकर, ग्रॉस विजेतेपद विनय दास्तीकोप तर उपविजेतेपद करुणाकर शेट्टी यांनी पटकाविले. तर स्पर्धेतील चॅम्पियनशिप विजेता राजेश कांबळे तर उपविजेतेपद डॉ. सौरभ कित्तूर यांनी पटकाविले. या विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे मेजर जनरल गुरय्या, ब्रिगेडियर कमांडर पीसी व्हिंग दयालन, कॅप्टन शिवकुमार एन. जे., गोल्फ संघटनेचे अध्यक्ष मोहन जे. सी., सचिव गिरीधर चांडक व शंतनू पुसाळकर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.