Tarun Bharat

मागील पक्षप्रमुखांनी प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना भवन दिले नाही हे शिवसैनिकांचे दुर्दैव

Advertisements

कोल्हापूर: शिवसेनेचे मागील पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना भवन दिले नाही. हे शिवसैनिकांचे दुर्दैव आहे. तर आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना भवन उभारण्याचा मानस व्यक्त केला. ही शिवसैनिकांसाठी आनंदाची बाब आहे. अशी प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी आज बोलताना दिली. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदे गटाची पदाधिकारी निवड लवकरच जाहीर करण्यात येईल. उद्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष जाहीर केले जातील. त्यानंतर शहर पदाधिकार्‍यांची निवड होईल. असे सांगत माझेच कार्यालय जिल्ह्यातील शिवसेना भवन होईल, असे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

Related Stories

कोल्हापूर : दहशत माजवण्याच्या स्टेटसमुळे गुन्हेगाराचा खूनातील जामीन अर्ज झाला रद्द

Abhijeet Shinde

सौर ऊर्जेचा वापर केल्यास भारत जगात अव्वल !

Sumit Tambekar

गोकुळमध्ये सत्तांतर! सतेज पाटील-मुश्रीफ गटाची 17-4 ने बाजी

Abhijeet Shinde

आजऱ्यात सोळा लाखाचा गुटखा जप्त

Sumit Tambekar

चालकांच्या बेफिकीरपणाचे नाहक बळी; अपघातांची मालिका सुरुच

Abhijeet Khandekar

पाचगावमधील व्यक्ती टिंबर मार्केट परिसरातील कोरोना मृत महिलेच्या संपर्कात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!