Tarun Bharat

साखळी नगराध्यक्षपदी राजेश सावळ यांची निवड

7 विरूद्ध 6 मतांच्या फरकाने निवड.या कार्यकाळातील चौथा नगराध्यक्ष

डिचोली / प्रतिनिधी

Advertisements

  साखळी नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी काल गुरू. दि. 26 मे रोजी संध्याकाळी पालिका कार्यालयात विशेष निवडणूक प्रक्रिया संपन्न होऊन राजेश सावळ यांची सात विरूध्द सहा मतांनी निवड झाली. विरोधी गटातील नगरसेवक यशवंत माडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. येणाऱया एका वर्षत सर्वांना बरोबर घेऊन साखळी नगरपालिका क्षेत्राचा विकास साधणार, असे यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी सांगितले.

  या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी आपला कार्यकाळ संपताच आपल्या पदाचा राजिनामा दिला होता. त्यामुळे नगराध्यक्षपदाची सुत्रे उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांच्याकडे आली होती. आता त्यांना टुगेदर फॉर साखळी या गटाने थेट नगराध्यक्षपदावर विराजमान केले आहे. सामंजस्य करारानुसार राय पार्सेकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजिनामा दिल्यानंतर राजेश सावळ यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित झाले होते.

   त्यानुसार टुगेदर फॉर साखळी या गटातर्फे राजेश सावळ यांनी तर भाजप गटातर्फे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष यशवंत माडकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. नगरपालिका कार्यालयात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. या वेळेत कोणीही आपला अर्ज मागे न घेतल्याने सावळ व माडकर यांच्यात निवडणूक घडविण्यात आली. या निवडणुकीत राजेश सावळ यांना सात मते मिळाली. तर यशवंत माडकर यांना सहा मते मिळाली. दोनही गट आपापली संख्या अबाधित राखण्यात यशस्वी झाले.

  राजेश सावळ यांच्या बाजूने माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, राया पार्सेकर, नगरसेवक राजेंद्र आमेशकर, ज्योती ब्लेगन, कुंदा माडकर व अन्सिरा खान यांनी मतदान केले. तर यशवंत माडकर यांच्या बाजूने नगरसेवक दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, शुभदा सावईकर, रश्मी देसाई व ब्रह्मानंद देसाई यांनी मतदान केले. राजेश सावळ हे साखळी नगरपालिकेचे चौथे नगराध्यक्ष ठरले आहे. यापूर्वी धर्मेश सगलानी, यशवंत माडकर, राया पार्सेकर यांनी हे पद भुषविले आहे. यावेळी माजी आमदार प्रताप गावस, काँग्रेस पक्षाचे नेते खेमलो सावंत यांनी उपस्थित राहून सवळ यांचे अभिनंदन केले.    नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश सावळ यांनी, आपण साखळी नगरपालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार असून विकासाच्या बाबतीत कोणताही भेदभाव किंला राजकारण केले जाणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन विकास साधला जाणार आहे. या कामी सर्व सहकारी नगरसेवकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

Related Stories

फोंडा नगराध्यक्षपदी अपूर्व दळवी निश्चित

Patil_p

मडगावात ‘बीग जी’ वर धाड, अवैध मद्य जप्त

Amit Kulkarni

रामनाथी येथील आश्रमाच्या पाठिमागे बेकायदा डोंगर सपाटीकरण

Amit Kulkarni

आगीत खाक झाला तो कचरा नव्हे, कंपोस्ट खत!

Patil_p

किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा मसुद्यास विरोध

Amit Kulkarni

गोव्यात एकाला ‘कोरोना’ची लागण झाल्याचा संशय

Patil_p
error: Content is protected !!