Tarun Bharat

राजीव कुमार भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 15 मे रोजी पदभार स्वीकारतील. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील चंद्रा 14 मे रोजी निवृत्त होत आहेत.

राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे आयएएस आहेत. 2 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेले राजीव कुमार हे 15 मे 2022 ते 18 फेब्रुवारी 2025 या कालावधीत या पदावर राहतील. भारत सरकारच्या 36 वर्षांहून अधिक काळ सेवा करताना, रजीव कुमार यांनी केंद्राच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि बिहार / झारखंडच्या त्यांच्या राज्य केडरमध्ये काम केले आहे. बीएस्सी, एलएलबी, पीजीडीएम आणि एमए पब्लिक पॉलिसी या शैक्षणिक पदव्या पूर्ण केल्यानंतर राजीव कुमार यांना सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वने, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रातील कामाचा व्यापक अनुभव आहे.

तंत्रज्ञानाचा वापर आणि अधिक पारदर्शकता आणणे, वितरणाच्या दिशेने विद्यमान धोरणात्मक व्यवस्थेत बदल घडवून आणणे यामध्ये ते पारंगत आहेत. राजीव कुमार फेब्रुवारी 2020 मध्ये भारत सरकारचे अर्थ सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर एप्रिल 2020 पासून 31 ऑगस्ट 2020 रोजी ते पद सोडण्यापर्यंत सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. राजीव कुमार 2015 पासून कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे आस्थापना अधिकारी देखील आहेत.

Related Stories

साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण

Archana Banage

पश्चिम बंगालमध्ये 200 गावे पाण्याखाली

Patil_p

जिग्नेश मेवाणी यांना जामीन मंजूर

datta jadhav

बिहारचे कृषीमंत्री सुधाकर सिंह यांचा तडकाफडकी राजीनामा

datta jadhav

नवीन आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला इशारा

Archana Banage

विरोधक ब्लॅक फंगस; खासदार संजय राऊतांचा विरोधकांवर हल्ला

Archana Banage