Rajnath Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदीजी थेट जनतेशी जोडले जातात. ते जनतेला समजतात आणि जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते. देशाची नाडी चांगल्या प्रकारे समजून घेणे हा त्यांच्या संघटन कौशल्याचा आत्मा आहे. महात्मा गांधींनंतर या देशातील जनतेची मनस्थिती समजून घेणारा एकच नेता असेल ते म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi) असं गौरद्गागार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं. तसेच मोदींचे तोंडभरून कौतुक केले. राष्ट्रपतींचे प्रेस सचिव अजय सिंग यांच्या ‘द आर्किटेक्ट ऑफ द न्यू बीजेपी: हाऊ नरेंद्र मोदी ट्रान्सफॉर्म्ड द पार्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी पार पडले. या प्रकाशन सोहळ्यास राजनाथ सिंह उपस्थित होते, या कार्यक्रमावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, मोदीजींनी आपल्या नवनवीन प्रयोगांनी भाजपला निवडणूक जिंकण्याचे यंत्र बनवले आहे. जिथे निवडणुका होतात तिथे भाजपचा विजय होतो आणि विचारधारेशी तडजोड नसते. म्हणूनच ‘मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.’ असं म्हणत मोदींचे कौतुक केले.


next post