Tarun Bharat

अभंग गायन स्पर्धेत राज्ञी फळदेसाई, साईराज गावडे प्रथम

वास्को : शांतीनगर वास्को येथील सुरभि संगीत विद्यालयातर्फे कै. जे. के. पवार यांच्या स्मरणार्थ मुरगांव तालुका मर्यादित आयोजित केलेल्या अभंग गायन स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. सदर स्पर्धा श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या आवारात वरिष्ठ व कनिष्ठ अशा दोन गटात घेण्यात आली. वरिष्ठ गटात राज्ञी फळदेसाई हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. स्पर्धेतील दुसरे बक्षीस स्वप्नील गांवकर तर तिसरे बक्षीस दक्षा सतीश परब हिला प्राप्त झाले. उत्तेजनार्थ बक्षिसे संतोष मोरूडकर, साईश शिंदे, श्रेया तुयेकर व भास्कर नाईक यांना देण्यात आली. खास बक्षीस सिद्धी होळकर हिला देण्यात आले. कनिष्ठ गटात साईराज गावडे याने प्रथम तर रेवा रायकर हिला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. स्पर्धकांना यावेळी तबल्यावर तेजस तोरस्कर, संवादिनीवर राजन बोरकर तसेच विघ्नेश सावंत, सुभाष आलपारकर व सुजन सावंत तर मंजीरी साथ यज्ञेश सातार्डेकर यांनी केली. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ भजनी कलाकार देवानंद भोसले यांनी केले.

बक्षीस वितरण समारंभाला रवींद्रभवनचे अध्यक्ष जयंत जाधव, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, राजश्री जाधव, देवानंद भोसले, श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचे अध्यक्ष रत्नाकर कांबळी, सुरभि संगीत विद्यालयाचे अध्यक्ष सर्वेश सातार्डेकर, खजिनदार यज्ञेश सातार्डेकर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्याहस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव काळे यांनी केले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी परीक्षक देवानंद भोसले, श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचे अध्यक्ष रत्नाकर कांबळी, सुरभि संगीत विद्यालयाचे अध्यक्ष सर्वेश सातार्डेकर, माजी अध्यक्ष रामचंद्र पटेकर, सचिव केतन खोर्जुवेकर, सदस्य हरिश्चंद्र नाईक आदी उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

Related Stories

ओल्ड गेवातील वादग्रस्त बंगल्याचे बांधकाम पाडा

Amit Kulkarni

सत्तरीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

Patil_p

मेळावलीत सरकारी जमिनीवर अतिक्रमण

Amit Kulkarni

सत्तरीतही कोरोनाचा प्रवेश

Omkar B

गोकुळवाडी सखळीत आढळले जिवंत नवजात बालक

Amit Kulkarni

तीन महिन्याचे पाण्याचे बिल 45 हजार रूपये

Amit Kulkarni
error: Content is protected !!