ऑनलाईन टीम/तरुण भारत
राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. दरम्यान एका सभेवेळी संबोधित करताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (swatantra veer savarkar) यांच्यावर टीका केली होती. यांनतर सावरकरांविरोधी वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील विविध पक्षांकडून राहुल गांधी यांचा निषेध केला जातोय. आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेगावात उद्या राहुल गांधींची सभा होणार आहे. यावेळी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवा असा आदेश दिला आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली आहे. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले असून त्यांचा या विधानावरून आता राजकारण पेटले आहे. भाजपने त्यांच्या या विधानाचा विरोध केला आहे. त्या पाठोपाठ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला आहे. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्या शेगाव येथे होणाऱ्या सभेच्या ठिकाणी जमत त्यांना काळे झेंडे दाखवा असे आदेश दिले आहेत.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या बुलढाण्यात असून शेगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठकरे यांनी शेगाव येथील सभेत जमा होत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिले आहेत.