Tarun Bharat

…अन्यथा सरकारनं रस्त्याच्या लढाईला तयार राहावं; FRP वरुन राजू शेट्टी आक्रमक

Advertisements

विनोद शिंगे, कुंभोज वार्ताहर

Raju Shetti : तुकड्यांने एफआरपी घेणार नाही ती एक रकमेच घेणार. दसऱ्यापूर्वी शेतकऱ्याला पन्नास हजार सानुग्रह अनुदान न मिळाल्यास सरकारने रस्त्याच्या लढाईला तयार राहावे,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. कुंभोज ता. हातकलंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर ‘एफआरपी’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सदर कार्यक्रमाची सुरुवात पूरोगामी चळवळीतल्या नेत्यांच्या फोटो पूजनाने करण्यात आली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी एकवटला आहे. काही कारखानदार साखर कारखाने चालू करण्याची भाषा करत आहेत, परिणामी शेतकरी संघटनेच्या मागण्यांचा प्रयत्न जोपर्यंत मिटत नाही तोवर ऊसाच्या कांडक्याला हात घालून देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच एफआरपी चा कायदा केंद्र सरकारने लागू केला असून ,त्यात बदल करून राज्य सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा सरकारचा घाट आहे. सगळीकडे डिजिटल माध्यमांचा वापर केला जात असताना साखर कारखान्याचे काटे मात्र कारखानदारांच्या ताब्यात आहेत. डिजिटल काटे बसवून त्याच्यावर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे अशी मागणी साखर संचालकाकडे केली आहे. साखर कारखानदारांची चाललेली राजरोसपणे काटेमारी थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यातील सर्व साखर कारखाने दीड ते अडीच टनाने शेतकऱ्यांच्या ऊसाचे काटे मारत असून त्यामध्ये त्यांना साडेचार हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. हे पैसे व साखर काळा बाजाराने विक्री करून सरकारचा जीएसटी बुडवला जात असून आपण आयकर विभागाकडे साखर कारखान्याच्या गोडाऊनची तपासणी करण्याची मागणी केली आहे. परिणामी यावर्षी ऊस तोडणी मजुरांना कोणत्याही शेतकऱ्यांनी ऊसतोडणीसाठी पैसे देऊ नयेत व जो शेतकरी पैसे देऊन ऊस तोडेल त्याचा ऊस जाळूनच कारखान्यात घातला जाईल असा इशाराही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

वीस वर्षांपूर्वी शेतकऱ्याचे असणारे प्रश्न वेगळे होते. चालू वर्षात शेतकऱ्याचे प्रश्न वेगळे आहेत. ऊसाला जरी भाव मिळत असला तरी सरकारने खते, बियाणांचे दर प्रचंड वाढवले असून, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सदर पैसे शेतकऱ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना व महापुरामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ढासळली असून चार चाकीतून खेळणारा शेतकरी मेळाव्यासाठी ट्रक मधून येत आहे हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

परिणामी यावर्षीची एफआरपी व ऊस दराची लढाई ऐतिहासिक असेल त्यासाठी टोकाचा संघर्ष करावा लागेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या दोन महिन्यात जागृती मेळाव्यांचे आयोजन करावे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास भडका उडणार व चळवळ तीव्र करणार असल्य़ाचेही त्य़ांनी सांगितले.

जिल्हा बँके संदर्भात बोलताना ते म्हणाले, साखर कारखान्याचे चेअरमनच जिल्हा बँक व सरकारी बँकेचे संचालक असून बँकांच्या माध्यमातून स्वतःचे खिसे भरून घेण्याचे काम चालू आहे. जिल्हा बँक व कारखान्याच्या माध्यमातून 3000 कोटीचा मलिदा खात असल्यामुळेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मताचा दर एका मताला 15 लाख रुपये झाला आहे. ही जिल्ह्यातील बँकेची बांडगूळ शेतकऱ्यांनी पोसायची का त्यासाठी नाबार्ड कडून कर्ज का घेत नाहीत .त्यांच्याकडून कर्ज घ्या.आता मस्तीत जगायचं तर सुस्ती सोडावी लागेल. गटातटाचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्षाला तयार राहा असे आव्हान राजू शेट्टी यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला केले.

मेळाव्याला हातकणंगले तालुक्यातून हजारो शेतकरी कुंभोज येथे उपस्थित राहिले होते. यावेळी ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब एडके, अजित पवार, रमेश भोजकर ,राजाराम देसाई ,सरपंच दिपाली गोंधळी आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे, माजी सरपंच माधुरी घोदे , प्रकाश पाटील व आभार किरण माळी यांनी मानले.

Related Stories

पीएम मोदींनी ‘मन की बात’मधून साधला महाराष्ट्रातील डॉ. शंशाक जोशी यांच्याशी संवाद

Archana Banage

एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांनाही ईडीकडून समन्स

Archana Banage

…तर लोकं कधीही माफ करणार नाहीत ; लसीकरणावरून नाना पटोले यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा

Archana Banage

बागणीत मृत बिबट्याचे पिल्लू सापडल्याने खळबळ

Archana Banage

RSS ची सहा कार्यालये बॉम्बने उडविण्याची धमकी

datta jadhav

गोकुळ शिरगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; बालकाच्या तोंडाचा घेतला चावा

Archana Banage
error: Content is protected !!