Tarun Bharat

आता फक्त मरण स्वस्त ; राजू शेट्टींची पोस्ट व्हायरल

Advertisements

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पॅकेबंद आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन, मटार गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर ५ टक्के जीएसटी (GST) लावण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे तरी मोडले आहेच. शिवाय राज्य़भरातून नविन जीएसटी संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. तर विरोधीपक्षाने केंद्र सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti)यांनी देखील टीकेची तोफ डागली आहे. त्य़ांनी फेसबुक पोस्ट केली आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर होत आहे. आता फक्त मरण स्वस्त आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.

राजू शेट्टी यांनी काय म्हटले आहे पोस्टमध्ये

राजू शेट्टी यांनी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, पेट्रोल-डिझेल-गॅस महाग, शिक्षण आवाक्याबाहेरचे, दवाखाना परवडत नाही, तेल, मीठ, चटणी, तांदूळ, डाळ, दही, साखर, वह्या-पुस्तके साऱ्यानाच जीएसटी… आता स्वस्त आहे फक्त मरण त्याला केव्हा लावता जीएसटी ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा- न्याय द्या, अन्यथा सर्वांसमोर आय़ुष्य संपवणार ; CM शिंदेंना पत्र पाठवत पिडितेचा इशारा

कोण-कोणत्या वस्तुवर जीएसटी लागू झाला आहे

-मासे, दही, पनीर, लस्सी, मध, मखाना, सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता पाच टक्के जीएसटी लागू झाला आहे.
-रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे.
-प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.

Related Stories

सरकार टिकवण्यासाठी उध्दव ठाकरेंना NCP चा पूर्णपणे पाठिंबा – अजित पवार

Abhijeet Khandekar

मित्रास काहीतरी सांगितल्याच्या गैरसमजातून एकास मारहाण

Abhijeet Shinde

किरीट सोमय्यांना ‘नो एंट्री’ म्हणणाऱ्या ‘त्या’ शहराने निर्णय बदला

Abhijeet Shinde

विद्यार्थ्यांना दिलासा : पदवी-पदव्युत्तरचे अंतिम वर्ष वगळता इतर वर्गाच्या परीक्षा रद्द : उदय सामंत

Rohan_P

ताजिकिस्तानमध्ये 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप

datta jadhav

सांगली : सात जणांचा बळी, नवे 139 रूग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!